आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाळूज:लेबर कॉन्ट्रॅक्ट न दिल्याने व्यवस्थापकास बेदम मारहाण, एमआयडीसीत गुंडाराज सुरूच

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
जखमी शिरीष राजेभोसले - Divya Marathi
जखमी शिरीष राजेभोसले
  • कंपनीतून घरी जाताना जोगेश्वरी शिवारातील एम सेक्टरलगत रस्त्यात अडवून अज्ञात गुंडांची मारहाण

औरंगाबाद येथील रेल्वे एमआयडीसीतील गुंडाराज अजुनही सुरूच आहे. एका कंपनीत घुसून कंपनीच्या व्यवस्थापक व संचालकास मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा अशीच घटना समोर आली आहे. वाळूज एमआयडीसी येथील एम सेक्टरमध्ये असणाऱ्या श्री गणेश कोटिंग या कंपनीत व्यवस्थापक म्हणून काम करणाऱ्या शिरीष राजेभोसले ( वय 39 रा.नक्षत्रवाडी, औरंगाबाद) यांना मंगळवारी सांयकाळी 7 वाजेच्या सुमारास कंपनीतून घरी जाताना जोगेश्वरी शिवारातील एम सेक्टरलगत रस्त्यात अडवून अज्ञात गुंडानी मारहाण केल्याची घटना घडली. सदरील मारहाण ही लेबर कॉन्ट्रॅक्ट न दिल्याच्या कारणातुन झाल्याची माहिती शिरीष राजेभोसले यांनी दिली आहे.

अधिक माहिती अशी की, एम सेक्टर येथील श्री कोटिंग या कंपनीत राजेभोसले हे व्यवस्थापक म्हणून काम करतात. सदरील कंपनीत 350 ते 370 कामगार काम करतात. या कंपनीत लेबर काँट्रॅक्टर मिळवण्यासाठी कायम ठेकेदारांची ये-जा सुरू असते. वेळेवर कामगारांचा पगार करणाऱ्या तसेच सर्वच कायदेशीरबाबींची पूर्तता करणाऱ्याच ठेकेदारांना लेबर कॉन्ट्रॅक्ट दिले जाते. मागील काही दिवसांपूर्वी एक ठेकेदार सदरील कंपनीत लेबर कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी राजेभोसले यांची प्रत्यक्ष भेट घेऊन व त्यानंतर वारंवार फोन करून लेबर कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी दबाव आणत होता. जर लेबर कॉन्ट्रॅक्ट मिळाले नाही तर तुम्हाला महागात पडेल शा प्रकारे राजेभोसले यांना धमकवल्याबाबत त्यांच्याकडे कॉल रेकॉर्डिंग असल्याचे त्यांनी सांगितले.

बेदम मारहाण
10 ऑगस्ट रोजी राजेभोसले हे कंपनीतील काम आटोपून घरी जाण्यासाठी त्यांच्या दुचाकीहून निघाले असता त्यांना काही अंतरावर 10 ते 12 गुंडांनी अडवून त्यांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाण का करत असल्याबाबाबत राजेभोसले जाब विचारत होते मात्र, काही एक न बोलता त्यांना मारहाण करण्यात आली. या मारहाणीत राजेभोसले यांच्या उजव्या हाताला, पोटात व उजव्या डोळ्यावर मार लागल्याने ते जखमी झाले आहेत.

बातम्या आणखी आहेत...