आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाॅप्युलर फ्रंट:देशविघातक कृत्यांसाठी औरंगाबाद होते पाॅप्युलर फ्रंटचे मुख्यालय; तीन वर्षे गुप्तचरांनी नजर ठेवून जमा केले पुरावे

औरंगाबाद11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दहशतवादविरोधी पथकाने गुरुवारी (२२ सप्टेंबर) सकाळीच बायजीपुऱ्यासह काही भागात एकाच वेळी छापे टाकून ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’च्या चार संशयितांना घरातून अटक केली. या संघटनेचे कार्यालयही सील करण्यात आले. दोन धर्मांत तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने शहरातील तरुणांची माथी भडकवण्याचे काम हे संशयित करत होते. त्यांना दहशतवाद्यांकडून पैसा पुरवला जात असल्याचा एटीएसच्या अधिकाऱ्यांना संशय आहे.

दरम्यान, या संघटनेचा पाचवा संशयितही सायंकाळी एटीएसने ताब्यात घेतला असून त्याला शुक्रवारी न्यायालयासमाेर हजर केले जाणार आहे. शेख इरफान शेख सलीम ऊर्फ मौलाना इरफान मिल्ली (३७, रा. किराडपुरा), सय्यद फैजल सय्यद खलील (२८, रा. रोजाबाग), परवेज खान मुजम्मील खान (२९, रा. बायजीपुरा), अब्दुल हादी अब्दुल रऊफ (३२, रा. जालना) अशी चार आरोपींची नावे आहेत. या सर्वांवर मुंबईच्या काळा चौकी पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून एटीएस पथक त्याचा तपास करत आहे.

राजाबाजार दंगलीतील गुन्हेगारांना मदतही
२००६ मध्ये केरळमध्ये सुरू झालेल्या पीएफआय संघटनेचे देशभरात जाळे आहे. महाराष्ट्रात मुंबई, पुणे, औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, नांदेड आदी शहरांत त्यांचे काम चालते.सुरुवातीच्या काळात संघटनेने मुख्यालय आैरंगाबादला बनवून इथूनच राज्यभर कारवाया सुुरू केल्या हाेत्या. ३ डिसेंबर २०२० रोजी ईडीने सीआरपीएफ जवानांच्या सुरक्षेत संघटनेच्या कार्यालयाची झडती घेतली होती, तर संघटनेच्या जिल्हा पदाधिकाऱ्याची कसून चाैकशी केली.

ईडीच्या पथकाने कार्यालयातून चार ते पाच डोनेशन बुक्स, १४७ पानांची एक फाइल, १०७ पानांची एक फाइल तर २२३ पानांची एक फाइल जप्त केले होते. विद्यार्थ्यांना दिलेल्या स्कॉलरशिपच्या नोंदी व आर्थिक व्यवहारांचीही चाैकशी. राजाबाजारमध्ये २०१८ मध्ये झालेल्या दंगलीनंतर संघटनेने दंगलग्रस्तांना मदत केली होती. गुन्हे दाखल झालेल्यांना वकील पुरवणे, त्यांची फी भरणे, नुकसान झालेल्यांना मदतही केली होती. त्याचा रिपोर्टही ईडीने सोबत नेला होता.

बातम्या आणखी आहेत...