आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजी-२० परिषदेच्या निमित्ताने येणाऱ्या परदेशी पाहुण्यांसमोर औरंगाबादची मान खाली घालण्याची तयारी सुरू झाली आहे, असे शनिवारी निदर्शनास आले.पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली जी-२० या जागतिक स्तरावरील परिषदेसाठी मुंबई, पुणे, नागपूरसोबत औरंगाबादची निवड झाली. त्यानिमित्ताने १३ ते १५ फेब्रुवारी कालावधीत ४० देशांतील किमान १००० पाहुणे औरंगाबादेत येतील. त्यांच्यासाठी खरेदी करण्यात येणाऱ्या खास १० इलेक्ट्रिक बसमध्ून ते अजिंठ्याला जातील. पण त्यांना या सिमेंट रस्त्यावर सुसाट प्रवास करता येणार नाही. कारण विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी वारंवार बजावूनही औरंगाबाद - अजिंठा रस्त्यावर ४७०० मीटर मार्गावर काही ठिकाणी पुलांचे बांधकाम झालेले नाही. काही ठिकाणी भूसंपादन झाले नाही. त्यामुळे पाहुण्यांची वाहने सिमेंटच्या रोडवरून खाली उतरवली जातील. तात्पुरत्या तयार केलेल्या रस्त्यावरून धावतील. हर्सूलच्या अरुंद रस्त्याचाही पाहुण्यांना सामना करावा लागेल. कारण १८ कोटींसाठी भूसंपादन रखडले आहे.
औरंगाबादेत ठरेल मातृत्वाची माया केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी सहकारमंत्री अतुल सावे, पालकमंत्री संदिपान भुमरे, आमदार हरिभाऊ बागडेंना सोबत घेत जी-२०साठी आढावा बैठक घेतली. ते म्हणाले की, औरंगाबादसाठी वुमन अँड चाइल्ड अशी संकल्पना देण्यात आली आहे. त्यानुसार जगभरातून येणारे मान्यवर पाहुणे विविध क्षेत्रांत महिला आणि बालकांचे काय स्थान असावे, त्यांचे भवितव्य काय असेल, याविषयी सखोल मंथन करून जागतिक आराखडा तयार करतील.
उद्योजकांचा मोठा सहभाग { परदेशी भाषांचे जाणकार असलेले उद्योजक पाहुण्यांना त्यांच्या भाषेत औरंगाबादचे महत्त्व सांगतील. ऑरिक सिटीला भेटीचे नियोजन आहे. वेरुळ महोत्सवालाही हे पाहुणे हजेरी लावतील. { औरंगाबादेतील रस्ते आणि इतर कामांसाठी ५० कोटी रुपये राज्य शासनाने दिले. केंद्राकडून निधी मागण्याचा प्रस्ताव आता तयार होत आहे. तो सप्टंेबरमध्येच करणे अपेक्षित होते. { बीबी का मकबरा येथील रस्त्याचे काम होण्याची ग्वाही डॉ. कराड यांनी दिली. पाणचक्की येथे पाहुण्यांना मनसोक्त आनंद घेता येईल, याची हमी नाही. { एक पृथ्वी, एक कुटुंब आणि एक भविष्य असे परिषदेचे ब्रीदवाक्य ठरले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.