आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक-पुणे मार्गावर धावणार:जानेवारीअखेर औरंगाबादला मिळणार 20 इलेक्ट्रिक बस

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात औरंगाबाद विभागाला २० इलेक्ट्रिक बस मिळणार आहेत. नवीन वर्षात पुणे आणि नाशिक मार्गावर या इलेक्ट्रिक बस प्रायोगिक तत्त्वावर चालवण्यात येतील, अशी माहिती एसटी विभागातर्फे देण्यात आली. विभागीय कार्यालयाशेजारी इलेक्ट्रिक चार्जिंग सेंटरचे कामही पूर्णत्वास गेले आहे.

महामंडळाने राज्यात ५,२५० इलेक्ट्रिक बस चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअंतर्गत औरंगाबाद विभागाला पहिल्या टप्प्यात २० इलेक्ट्रिक बस देण्यात येणार आहेत. शहरातील विभागीय कार्यालयाशेजारील इलेक्ट्रिक चार्जिंग सेंटरचे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात बस आल्यानंतर सेवा सुरू होईल.

एका वेळेस चार्ज होतील आठ बसेस शहरातील चार्जिंग सेंटरवर एका वेळेस आठ बसेस चार्ज होतील. त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. - सचिन क्षीरसागर, विभाग नियंत्रक

बातम्या आणखी आहेत...