आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद:सिडकोत गतिमंद महिलेवर अत्याचार करणारा कॅफेचालकामुळे गजाआड, सीसीटीव्ही फुटेज तपासताना दिसली विकृती

औरंगाबाद24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिडकोतील एका सतर्क कॅफेचालकामुळे गतिमंद महिलेवर अत्याचार करणाऱ्या नराधम आकाश ऊर्फ टोंग्या भगवान तुपेला (२१, एन-७) पोलिसांनी गजाआड केले. त्याच्या साथीदाराचा शोध सुरू आहे. हा कॅफेचालक त्याच्याकडील सीसीटीव्ही फुटेज पाहत असताना त्याला हा धक्कादायक प्रकार दिसला. त्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करत २४ तासांत एका आरोपीला जेरबंद केले.

एन-७ येथील व्यापारी संकुलातील कॅफेसमोर दररोज कुणीतरी घाण करत होते. त्याचा शोध घेण्यासाठी कॅफेचालकाने सीसीटीव्ही लावले. २६ जून रोजी तो फुटेज तपासत असताना रात्री दहा-साडेदहाच्या सुमारास या गतिमंद महिलेवर दुकानासमोर दोघे अत्याचार करत असल्याचे दिसले. त्याने सिडको पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अशोक गिरी यांच्याकडे धाव घेतली. फुटेज पाहिल्यावर गिरी, उपनिरीक्षक प्रतिभा आबुज यांनी महिला दक्षता समितीच्या सदस्यांसोबत तपास केला. २० जून रोजीही तिच्यावर अत्याचार झाला होता. सिडको भागात फिरणाऱ्या मवाल्यांनी हा विकृत प्रकार केल्याचे समोर आले. पोलिसांनी तत्काळ सूत्रे हलवत आकाशला अटक केली. त्याच्या साथीदाराचा शोध सुरू आहे, असे गिरी यांनी सांगितले. ती महिला तक्रार देऊ शकत नसल्याने कॅफेचालकाची तक्रार ग्राह्य धरून गुन्हा नोंदवण्यात आला, असेही ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...