आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आम आदमी पक्षाची युवा आघाडी जाहीर:जिल्हाध्यक्षपदी आशिष सिसोदे, तर उपाध्यक्षपदी अतुल निकम यांची निवड

औरंगाबाद6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
युवा आघाडी जिल्हाध्यक्ष​​​​​​पदी​ आशिष सिसोदे यांची निवड करण्यात आली आहे. - Divya Marathi
युवा आघाडी जिल्हाध्यक्ष​​​​​​पदी​ आशिष सिसोदे यांची निवड करण्यात आली आहे.

आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष रघुनाथ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी महत्त्वाची बैठक पार पडली. बैठकीत औरंगाबाद जिल्हा व शहराची युवा आघाडी सर्वानुमते जाहीर करण्यात आली.

जिल्ह्यामध्ये व शहरांमध्ये प्रत्येक तालुका वार्डामध्ये युवकांचे मजबूत संघटन उभे करणे, युवकांचे प्रश्न सोडविण्यासाठी संघर्ष करणे, आगामी निवडणुकीसाठी संघटना बळकटीकरण करण्यासाठी आमा आदमी पार्टीच्यावतीने नियोजन केले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून शहर जिल्हा कार्यकारिणी जाहीर करून पदाधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

नवनिर्वाचित कार्यकारणी खालीलप्रमाणे

युवा आघाडी जिल्हाध्यक्ष आशिष सिसोदे, उपाध्यक्ष अतुल निकम, सतीश लोखंडे, सचिव आदित्य वाघमारे, कोषाध्यक्ष योगेश जगदाळे, प्रसिद्धी प्रमुख अमोल गोटे पाटील, युवा शहर आघाडी शहराध्यक्ष अभिषेक सात्रळकर, शहर उपाध्यक्ष आकाश भुईगड, किरण आरके, उपाध्यक्ष मुस्तफा मिर्झा बेग, सचिव दीपक ढगे, कोषाध्यक्ष राहुल जोगदंड यांची निवड करून त्यांच्यावर संघटन बांधणी, समाजिक प्रश्न सोडविण्यासाठी जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

युवा शहर आघाडी शहराध्यक्ष अभिषेक सात्रळकर.
युवा शहर आघाडी शहराध्यक्ष अभिषेक सात्रळकर.
बातम्या आणखी आहेत...