आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद जि.प.चा निर्णय:कमी प्रमाणात कोरोना लसीकरण झालेली गावे राहणार निधीपासून वंचित

औरंगाबाद19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनाचा प्रादुर्भाव अजूनही संपलेला नाही. त्यामुळे सर्वांनी अजूनही काळजी घेणे आवश्यक आहे. कोरोनाच्या चौथ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे लसीकरणावर पुन्हा एकदा भर देण्यात येत असून, ज्या गावांमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाचे प्रमाण कमी आहे अथवा शंभर टक्के लसीकरण झालेले नाही. अशा गावांना कोणत्याही योजनांचा लाभ दिला जाणार नाही. तसेच त्यांना शासनाच्या वतीने देण्यात येणारा निधी देखील थांबविण्यात येईल. अशी माहिती औरंगाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे यंानी दिली आहे.

गेल्या दोन वर्षापासून कोरानाचा प्रादुर्भावामुळे विविध क्षेत्र प्रभावित झाली आहेत. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नयेे. यासाठी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून विविध उपाय योजना करण्यात आल्या आहेत. नियमित मास्कचा वापर करणे, सुरक्षित अंतर ठेवणे, कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करुन घेणे आदी बंधनकारक करण्यात आले. कोरोनाचा प्रभाव कमी झाला असला तरी अजूनही कोरोना पूर्णपणे संपलेला नाही. आता तर चौथ्या लाटेची शक्यता देखील वर्तविण्यात आली आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक लस घेणे अनिवार्य करण्यात आले आहे. परंतु अजूही शंभर टक्के लसीकरण झालेले नाही.नागरिकांचा हवा तसा प्रतिसाद सध्या शहर असो वा ग्रामीण भागातही मिळत नसल्याचे चित्र आहे. ज्यांचा पहिला डोस घेवून झाला आहे ते दुसरा डोस घेण्यासाठी येत नाही. तर ज्यांचे दोन्ही डोस झाले आहेत. त्यापैकी बहुतांश जणांनी सुरक्षेसाठी देण्यात येणारा तिसरा बुस्टर डोसही घेतला नसल्याचे गटणे यांनी सांगितले. मे महिन्यापर्यंत १९७२३६४ जणांनी पहिला डोस घेतला आहे. तर १४९२४८७ जणांनी दुसरा डोस घेतला आहे. बुस्टर डोस २६२९९ जणांनी जिल्हयात घेतला आहे. आतापर्यंत एकूण ३४६४८५१ जणांनी कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतली आहे. परंतु अजूही काही गावे अशी आहेत. जिथे शंभर टक्के लसीकरण झालेले नाही. त्यामुळे आता ज्या गावांमध्ये शंभर टक्के लसीकरण झालेले नाही अथवा कमी लसीकरण झाले आहे. त्यांना मिळणारा विविध योजनांसाठीचा निधी थांबविण्यात येईल असेही गटणे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...