आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गरब्यावर ताल:चिनी दांडिया हाती घेऊन गुजरातच्या गरब्यावर ताल धरणार औरंगाबादकर

रोशनी शिंपी । औरंगाबाद10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

धूमधडाक्यात साजऱ्या झालेल्या गणेशोत्सवानंतर तरुणाईला वेध लागले आहेत नवरात्रोत्सवाचे. त्यातही दोन वर्षांनंतर दांडियाची धूम होणार असल्याने त्यांचा उत्साह टिपेला पोहोचला आहे. चिनी बनावटीच्या एलईडी लाइट असलेल्या दांडियांचे यंदा विशेष आकर्षण आहे. त्या घेऊन गुजरातच्या गरब्यावर हजारो औरंगाबादकर ताल धरणार आहेत. शहरात २० ते २५ हजार दांडियांची आयात झाली आहे.

गरबा नृत्याकरिता शहरातील नृत्य दिग्दर्शकांनी १७० हून अधिक कार्यशाळा घेतल्या आहेत. यामध्ये २५०० जणांनी प्रशिक्षण घेतल्याचा अंदाज प्रशिक्षकांनी वर्तवला. सोशल मीडियाप्रेमी युवकांनी रील बनवण्यासाठी गरबा नृत्याचे रीतसर प्रशिक्षण घेण्यावर भर दिला आहे. जवळपास २५०० लोकांनी हे प्रशिक्षण घेतल्याचा प्रशिक्षकांचा अंदाज आहे.

कार्यशाळांना प्रतिसाद
यांच्या नुकत्याच झालेल्या कार्यशाळेत ३० महिला आणि तरुणींनी सहभाग घेतला होता. पण, प्रचंड मागणीमुळे पुन्हा एका वर्कशॉपचे आयोजन करणार असल्याचे वैशाली म्हणाल्या. बॉम्बे छकडी, छकडी, गंगुबाई यांसह गुजरातच्या पारंपरिक शैलीला विशेष पसंती आणि मागणी आहे. वैशाली बस्सी, प्रशिक्षक

महिलांकडून प्रतिसाद मोठा
शहरातील नृत्य दिग्दर्शक असंघटित आहेत. जवळपास २५० ते ३०० नृत्य शिक्षक वेगवेगळ्या भागांत नृत्य शिकवतात. नवरात्रीपूर्वी किमान १७० कार्यशाळा झाल्याचा अंदाज आहे. यामध्ये महिलांचा प्रतिसाद जोरदार आहे. चेतन पाटील

बातम्या आणखी आहेत...