आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:औरंगाबादकरांनो, डोळे बंद करून सांगा... माझे शहर स्वच्छ आहे!

औरंगाबाद7 महिन्यांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानात औरंगाबादचे स्थान २२ वरून देशात पहिल्या १० शहरांत आणण्यासाठी महापालिका प्रशासनाने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. यात इतर कागदोपत्री ‘प्रेझेंटेशन’ करण्यात प्रशासन तरबेज आहे. मात्र पाहणीसाठी येणारे पथक थेट कॉलन्या-कॉलन्यांत जाऊन नागरिकांचा फीडबॅकही घेते. महिनाअखेरीस होणाऱ्या या सर्वेक्षणात मात्र ‘पितळ उघडे’ पडण्याची भीती प्रशासनाला आहे. त्यामुळे मनपाच्या प्रशासनाने ‘शहराची प्रतिष्ठा वाढवणे तुमच्या हाती आहे’ असे भावनिक आवाहन करून पथकासमोर सकारात्मक फीडबॅक देण्याचे विनंतीवजा आवाहन शहरवासीयांना केले आहे.

खासगी कंपनीचे खिसे भरण्यास प्राधान्य
शहरात रेड्डी कंपनीमार्फत कचरा संकलन केले जाते. त्यासाठी मनपा दरमहा लाखो रुपये खर्च करते. मात्र खरोखरच कचरा संकलित होतो का याची तपासणी होत नाही. त्यामुळे शहराच्या अनेक भागांत कचऱ्याचे ढीग साचलेले असतात. टॉप टेनमध्ये येण्यासाठी पथकासमोर देखावा करण्याचा मनपाचा खटाटोप
कचऱ्यासंदर्भात काही तक्रार असेल तर मनपाने ‘टोल फ्री’ नंबरची नुसतीच घोषणा केली, मात्र प्रत्यक्षात ही यंत्रणा विस्कळीत असते. कधी फोन लागलाच तर तक्रारीचे निराकरणही केले जात नाही.

बातम्या आणखी आहेत...