आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रीय कराटे स्पर्धा:औरंगाबादचा 26 सदस्यीय संघ जाहीर; गोव्यात होणार सामने

औरंगाबाद9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पेडम स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, मापसा (गोवा) येथे 26 ते 27 नोव्हेंबरदरम्यान खुल्या राष्ट्रीय कराटे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी मिशन मार्शल आर्ट्स अ‍ॅड वुशु कुंग-फु स्पोर्ट्स कराटे असोसिएशन इंडियातर्फे 26 सदस्यीय संघांची घोषणा करण्यात आली. हा संघ 25 नोव्हेंबर रोजी स्पर्धेसाठी गोव्याला रवाना होणार आहे.

स्पर्धेत काता व कुमिते या दोन प्रकारांमध्ये मुले-मुली खेळाडू आपले कौशल्य पणाला लावतील. संघटनेच्या हॉलवर झालेल्या निवड चाचणी स्पर्धेत खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली. निवड झालेल्या खेळाडूंना मुख्य प्रशिक्षक पवन घुगे यांच्यासह प्रविण घुगे, राधा घुगे, नंदा घुगे, शाम बुधवंत, राम बुधवंत यांचे मार्गदर्शन लाभत आहे. या खेळाडूंना पुढील स्पर्धेसाठी बुडो मार्शल आर्टस संघटनेचे अध्यक्ष लहू पारवे, इरा इंटरनॅशनल स्कूलचे संचालक डॉ.सतीश गोरे, ब्ल्यू व्हॅली स्कूलच्या मुख्याध्यापिका सविता तोतला, ब्लूमिंग बर्ड स्कूलच्या मुख्याध्यापिका सपना देशमुख, समाजसेवक विश्वनाथ घुगे आदींनी अभिनंदन केले.

औरंगाबाद 12 पदकांचांची अपेक्षा

राष्ट्रीय स्पर्धेत औरंगाबादचे खेळाडू उत्कृष्ट कामगिरी करतील. संघात चांगले खेळाडू असून किमान 10 ते 12 पदके आपण जिंकू शकतो. सेंथमराई, पुजारी, घुगे, ठाकर, चव्हाण आणि बुधवंत बंधू हे खेळाडू पदकाचे प्रमुख दावेदार आहेत. खेळाडूंचा सराव चांगला झाला आहे. मोठ्या स्पर्धेत पंजाब, हरियाणा, तामिळनाडू संघातील खेळाडूंचे आव्हान असणार आहे, असे प्रशिक्षक पवन घुगे यांनी सांगितले.

संघात निवड झालेले खेळाडू पुढीलप्रमाणे

मुली - अनुश्री घुगे, तनुश्री घुगे, मनस्वी गावंडे, एम. सेंथामराई, आर्या मुळे, समीक्षा पुजारी, अंकिता मेने, सायली गोरे, शौर्या मोरे, साक्षी कळवणे, कोमल पारवे, वेदिका तोरमड, जियांशी ठाकर, स्वरा कुलकर्णी, प्रियांशी जांगीड. मुले - यशोधन घुगे, अभिनव तिडके, अद्वैत गावंडे, श्रेयश मामीलवाड, रुद्र चव्हाण, मल्हार कुलकर्णी, गजराज जाट, कुणाल लाड, अभिजीत देशमुख, राम बुधवंत, शाम बुधवंत.

बातम्या आणखी आहेत...