आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजी-२० च्या निमित्ताने शहरात ४५ देशांचे प्रतिनिधी येणार आहेत. त्याच्या तयारीसाठी करण्यासाठी ए-२० ची स्थापना करण्यात आली आहे. शहरातील उद्योजक, व्यापारी, क्रेडाई, आयएमए अशा २० संस्था एकत्र येऊन टीम असोसिएशन हा फोरम तयार केला आहे. या सगळ्या संस्थेचे स्वयंसेवक एकत्र येऊन प्रशासनाला जी -२० च्या कामात सहकार्य करणार असल्याची माहिती उद्योजक मुकुंद कुलकर्णी यांनी दिली. सदर ए-२० तर्फे ११ व १२ फेब्रुवारी रोजी शहरात महास्वच्छता अभियान राबविण्यात येणार असून त्यात ५० हजारांपेक्षा अधिक नागरिकांना सहभागी करून घेण्याचा प्रयत्न टीम ऑफ असोसिएशन करणार आहे. या वेळी व्यापारी महासंघाचे संजय कांकरिया, प्रसाद कोकीळ, प्रशांत देशपांडे उपस्थित होते.
जी-२० परिषदेतील महिलांसोबत कार्यरत डब्ल्यू-२० हे पथक औरंगाबादला तर बी-२० हे बिझनेस पथक ऑगस्टमध्ये मुंबईत येणार आहे. पथकातील शिष्टमंडळाने औरंगाबादमध्ये यावे यासाठी उद्योजक संघटना प्रयत्नशील असल्याची माहिती मुकुंद कुलकर्णी यांनी दिली. ४५ देशांमधील परदेशी पाहुण्यांना ऑरिक सिटी आणि औरंगाबादच्या उद्योग क्षेत्राची माहिती देण्याकरिता वेळ मिळावा यासाठी प्रयत्न करीत असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले.
चौकट १ - ए-२० ची टीम ऑफ असोसिएशन औरंगाबाद फर्स्ट, सीएमआयए, मसिआ, सीआयआय, एजीव्हीएम, एआयएसए, क्रेडाई, एआयसीए, आयसीएआय, टीपीए, एलयूबी, बीआयएमटीए, आयएमए, एनआयपीएम, एपीपीएफ, एसआयएएम, एटीडीएफ, एएच अँड आरए, एटीजीडब्ल्यूए
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.