आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पर्यावरण दिन:औरंगाबादची हवा सुधारली, पण घनकचऱ्याची समस्या कायम ; भूजल, औद्योगिक प्रदूषण वाढल्याचा निष्कर्ष

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या वर्षभरात औरंगाबाद शहराची हवा सुधारली आहे. मात्र, शहरातील भूजल प्रदूषित झाले आहे. ऐन सायलेन्स झोनमध्ये ध्वनी प्रदूषण झाल्याचे समोर आले आहे. प्रदूषण करणाऱ्या उद्योगातही वाढ झाली आहे. घनकचरा व्यवस्थापनाची समस्याही कायम असल्याचे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या २०२०-२१ चा वार्षिक अहवालातून स्पष्ट झाले. या अहवालाच्या २०१८-१९ च्या अहवालाशी तुलनेत कोरोनापूर्व व कोरोनानंतरच्या शहराच्या पर्यावरणाच्या स्थितीचे चित्र स्पष्ट झाले. धूलिकण वाढले, तरी आटोक्यात : प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने ४ ठिकाणी हवेची गुणवत्ता तपासली जाते. यानुसार २०२०-२१ मध्ये सल्फर डायऑक्साइड आणि नायट्रोजन डायऑक्साइडचे प्रमाण २०१८-१९ च्या तुलनेत वाढले. मात्र, ते मर्यादेतच राहिले. वाळूजला धूलिकण म्हणजे पीएम १० चे प्रमाण वाळूजला वाढले आहे. घनकचरा व्यवस्थापनात मागेच : औरंगाबाद विभागात वर्षभरात १७४८.६३ मेट्रिक टन घनकचरा निघतो. त्यापैकी ११७०.६५ मेट्रिक टन म्हणजेच ६६.९५ टक्के कचऱ्यावरच प्रक्रिया होते.

भूजल आणि भूतलावरील पाण्याचा इंडेक्स वेगवेगळा येतो. एमपीसीबीचे गोदावरी खोऱ्यात वॉटर क्वालिटी मॉनिटरिंग स्टेशन आहे. गोदावरी खोरे १ मधील औरंगाबाद जिल्ह्यात पाण्याची गुणवत्ता उत्कृष्ट होती. मात्र, भूजलाचे ५० टक्के नमुने वाईट श्रेणीतील आढळले.

१०० टक्के घरगुती सांडपाण्यावर प्रक्रिया वाळूज येथे १० एमएलडी क्षमतेचा सामूहिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (सीईटीपी) आहे. २०१८-१९ मध्ये यात ४-५ एमएलडी पाण्यावर प्रक्रिया व्हायची. आता ५ एमएलडीवर होते. घरगुती सांडपाण्यावर प्रक्रिया करणारे ७ प्रकल्प (एसटीपी) आहेत. १०० टक्के सांडपाण्यावर प्रक्रिया होते.

दोन वर्षांत लाल श्रेणीतील उद्योगात वाढ केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयाने ६० पेक्षा अधिक पोल्युशन इंडेक्स असणारे उद्योग लाल, ४१ ते ५९ इंडेक्स असणारे केशरी, २१ ते ४० इंडेक्स असणारे हिरवा, तर २० पर्यंत इंडेक्स असणाऱ्या उद्योगांचे पांढऱ्या श्रेणीत वर्गीकरण केले आहे. यानुसार गेल्या २ वर्षांत शहरातील लाल श्रेणीतील उद्योगात दुपटीहून अधिक वाढ झाली आहे.

सायलेन्स झोनमध्ये आवाजाची मर्यादा जास्त मंडळाने फेब्रुवारीमध्ये सणवार नसताना सामान्य दिवशी केलेल्या चाचण्यात सायलेन्स झोन असलेल्या घाटी परिसरात दिवसा तसेच रात्रीही आवाजाची मर्यादा ओलांडल्याचे आढळले. प्रामुख्याने वाहनांचे आवाज, वाहनांचे हॉर्न, वाहनातील गाण्यांचे आवाज, डीजे यामुळे ही मर्यादा वाढते.

बातम्या आणखी आहेत...