आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादची प्रसिद्ध युट्यूब स्टार बिंदास काव्याचा लागला शोध:मध्य प्रदेशच्या इटारसीमध्ये सापडली

औरंगाबाद15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

युट्युवर लाखो फॉलोवर्स असलेली औरंगाबादची प्रसिद्ध युट्यूब स्टार 'बिंदास काव्या'चा अखेर शोध लागला आहे. ती मध्य प्रदेशच्या इटारसीमध्ये सापडली आहे. मागील चोवीस तासापासून ती बेपत्ता झाली होती. तिच्या आईने सोशल मीडियावर तिला परत येण्याचे आवाहन करणारा व्हिडिओ टाकल्यानंतर सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली होती.

प्रसिद्ध सोशल मीडिया इनफ्लूयन्सर म्हणून ओळखली जाणारी बिंदास काव्या 9 सप्टेंबरला घरातून दुपारी 2 च्या सुमारास रागाच्या भरात निघून गेली होती. त्यानंतर ती परतली नाही. सायंकाळ होऊनही ती परत न आल्याने कुटुंब मात्र घाबरून गेले होते. काव्याने मोबाइल देखील बंद केला आहे. त्यामुळे तिच्या आई वडिलांनी छावणी पोलिस ठाण्यात धाव घेतली. काव्या अल्पवयीन असल्याने अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

काव्याची आई रडून रडून बेहाल झाली
काव्याची आई रडून रडून बेहाल झाली

पडेगाव भागात राहते

औरंगाबादच्या पडेगाव भागात आई-वडिलांसह राहणारी काव्या मागील वर्षभरात युट्युबवर प्रसिद्धीच्या झोतात आली. युट्यूबवर तिच्या जवळपास सर्व व्हिडिओला 5 ते 45 मिलियन व्ह्यूजमध्ये प्रतिसाद मिळतो. साडेचार मिलियन सबस्क्राईब असलेली काव्व्या वडिलांसोबतच्या व्हिडीओमुळे जास्त प्रसिद्ध झाली. युट्यूब व्यतिरिक्तही ती अन्य सोशल मीडियावर देखील प्रसिद्ध आहे.

घरातून बाहेर पडताना काव्या
घरातून बाहेर पडताना काव्या

तोंडाला स्कार्फ बांंधून बाहेर

शेवटची ती निळी जीन्स, पांढरे बूट व तोंडाला स्कार्फ परिधान करून बाहेर पडली होती. एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ती कैद झाली. आई वडिलांनी विविध सोशल मीडियावरून ती बेपता झाल्याचे सांगून तिला परत येण्याचे आवाहन केले होते. तर कोणाला काही माहिती असल्यास त्यांना माहिती देण्याचे आवाहन केले होते. काव्याच्या बेपत्ता होण्याची रितसतर तक्रार करण्यात आली असून सायबर पोलिसांच्या मदतीने तपास सुरू असल्याचे छावणीचे पोलिस निरीक्षक शरद इंगळे यांनी सांगितले.

कोण ही बिंदास काव्या?

बिंदास काव्याचे खरे नाव काव्यश्री यादव आहे. तिचा जन्म 30 मार्च 2004 रोजी महाराष्ट्रातील औरंगाबाद येथे झाला. वयाच्या 15 व्या वर्षी तिने लोकप्रियता मिळवली. काव्याला तिचे आई-वडिल फार सपोर्ट करतात. काव्याचे Bindas Kavya नावाने यूट्यूब चॅनेल आहे. या चॅनलवर तिचे व्लॉग अपलोड करत असते. नोव्हेंबर 2017 मध्ये हे चॅनल तिने सुरू केले होते. काव्याने कमी वयात youtube वर यशस्वी भरारी घेतली आहे.

बातम्या आणखी आहेत...