आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

18वी कनिष्ठ राष्ट्रीय जंप रोप स्पर्धा:औरंगाबादच्या हर्ष आणि चैतन्यची मध्य प्रदेशात कौतूकास्पद कामगिरी, पटकावली 4 पदके

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आग्रा येथे जंप रोप फेडरेशन ऑफ इंडिया अंतर्गत उत्तर प्रदेश जंप रोप असोसिएशनने राष्ट्रीय स्तरावरील कनिष्ठ गटासाठी 25 ते 27 मार्च दरम्यान स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत गुजरात, मध्य प्रदेश, आसाम, हरियाणा, कर्नाटक आणि महाराष्ट्रातील संघांनी सहभाग घेतला होता. विविध संघातील सुमारे 350 जण या स्पर्धेत उतरले होते. या स्पर्धेत औरंगाबादमधील दोघांनी कौतूकास्पद कामगिरी करत 4 पदके पटकावली आहेत.

हर्ष ताकवले आणि चैतन्य हरणे या दोघांनी 30 सेकंदाच्या रिले प्रकारात रौप्यपदक पटकावलं. तर हर्षने 30 सेकंदाच्या स्पीड प्रकारात वैयक्तिक सुवर्ण मिळवलं. तर चैतन्यने 3 मिनिटांच्या इंडोरन्समध्ये कांस्यपदक मिळवलं. हर्ष आणि चैतन्य यांना प्रशिक्षक अभिजीत नरवडे यांनी प्रशिक्षण दिलं आहे. तर एकूण चार पदके या दोघांनी पटकावली आहेत.

जंप रोप असोसिएशन ऑफ औरंगाबाद जिल्ह्याचे सचिव अभिजीत नरवडे यांनी विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल कौतुक केले. एमजीएमचे सचिव अंकुशराव कदम आणि जंप रोप असोसिएशनचे औरंगाबाद जिल्हा राजेंद्र जंजाळ यांनी हर्ष आणि चैतन्यचे अभिनंदन केले.

जंप रोप फेडरेशन ऑफ इंडियाने आयोजित केलेल्या आगामी राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी या विद्यार्थ्यांची आता निवड झाली आहे. येत्या काही वर्षांत युवा जंपर्स आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये कामगिरी करण्याचे लक्ष्य गाठू शकतात, अशी आशा प्रशिक्षकांनी यावेळी व्यक्त केली.

बातम्या आणखी आहेत...