आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठपका:मेट्रोचे स्वप्न पाहणाऱ्या औरंगाबादेत सार्वजनिक वाहतुकीचा बट्ट्याबोळ; सिटी बससेवा फक्त 4% लोकांसाठी उपयोगी

औरंगाबाद / मंदार जोशीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मेट्रो रेल्वेची स्वप्ने पाहणाऱ्या औरंगाबादेतील सार्वजनिक वाहतुकीचा बट्ट्याबोळ झाल्याचा अनुभव आपण रोजच घेतो. पण देशातील अग्रगण्य संस्था यूएमटीसीने (अर्बन मास ट्रान्झिट कंपनी) शहराचा अभ्यास करून त्यावर शिक्कामोर्तब केले आहे. या कंपनीने सादर केलेल्या कॉम्प्रेहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅनमध्ये औरंगाबादेतील वाहतुकीला फक्त तीन रेटिंग दिले आहे. त्याचा अर्थ सुधारणेला अजून खूप वाव आहे. सिटी बससेवा दुबळी असल्याने चारच टक्के प्रवासी त्याचा वापर करतात. परिणामी ३८ टक्के लोकांवर दुचाकीने तर ३६ टक्के लोकांवर ऑटोरिक्षाने प्रवास करण्याची वेळ येते, असे निरीक्षणही मांडण्यात आले. वाहनांची अशी संख्या वाढल्याने वाहतूक कोंडीची समस्या आहे.

शहरात मेट्रो सुरू करण्यापूर्वी महामेट्रो कंपनीने ‘यूएमटीसी’ कंपनीला शहराचा अभ्यास करण्यास सांगितले होेते. कंपनीचे अधिकारी एस. रामकृष्णन यांनी चार दिवसांपूर्वी या प्रकल्पाच्या आराखड्याचे सादरीकरण करताना सार्वजनिक वाहतुकीची विदारक परिस्थिती मांडली. २०५२ मधील लोकसंख्या, वाहने लक्षात घेऊन हा अभ्यास केला आहे. तत्काळ व टप्प्याटप्प्याने काय सुधारणा कराव्यात, अशा सूचना कंपनीने केल्या आहेत. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सार्वजनिक वाहतूक सक्षम करणे आवश्यक आहे. शहरात फुटपाथ नाही, बहुतांश पार्किंगही रस्त्यावर असते, ट्रक आणि मालवाहतूक गाड्यांसाठी पार्किंगची जागा नसल्यामुळे ही वाहनेही रस्त्यांच्या बाजूला उभी राहतात, शहरापासून जवळ असलेल्या पडेगाव, चिकलठाणा, कांचनवाडी, देवळाई या भागांना जोडण्यासाठी चांगली व्यवस्था नसल्याचे निरीक्षणही नोंदवले आहे.

शहरात मंजूर १०० सिटी बस, प्रत्यक्षात ५० ही धावत नाहीत { स्मार्ट सिटी प्रकल्पातून शहरात १०० सिटी बस खरेदी करण्यात आल्या आहेत. मात्र पूर्ण क्षमतेने त्या कधीच धावल्या नाहीत. { कधी कोरोनामुळे तर कधी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे अशी २ वर्षे सेवाच बंद होती. नंतर २५ ते ३० बस सुरू करण्यात आल्या. आता ५० बस धावत असल्याचा दावा केला जातोय, पण त्याही दिसत नाहीत. { शहराबाहेरील अनेक वसाहतीपर्यंत सिटी बस अजूनही पोहोचल्या नाहीत. { २०० कोटींच्या एफडीवरील व्याजावर सिटी बसचा खर्च भागवण्याचे नियोजन होते. पण आता रस्त्याच्या कामासाठी ही एफडीही मोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भविष्यात ही तोट्यातील सेवा सुरू राहण्याबाबत शंका आहे. { कंपनीच्या मते, यापूर्वी हैदराबाद, भोपाळमध्येही सार्वजनिक वाहतूक दुबळी होती. पण दहा वर्षांत चांगले काम झाल्याने आता तिथे ती लाइफलाइन बनली आहे.

यूएमटीसीचे महत्त्व काय केंद्रीय नगरविकास मंत्रालयाशी संलग्न अर्बन मास ट्रान्झिट कंपनीची देशातील अग्रगण्य कन्सल्टन्सी फर्म म्हणून ओळख आहे. २५ वर्षांपासून या संस्थेचे काम सुरू आहे. या संस्थेत केंद्रीय नगरविकास खाते व आंध्र सरकारचा प्रत्येकी २५ टक्के हिस्सा आहे. यापूर्वी कंपनीने हैदराबाद, तेलंगण, नागपूर, पिंपरी-चिंचवड, पुणे मेट्रोसाठी अभ्यास केला आहे.

बातम्या आणखी आहेत...