आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जलतरण:आंतरराष्ट्रीय मास्टर्स स्पर्धेत औरंगाबादच्या राजेश भोसलेने पटकावली तीन पदके

औरंगाबाद9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पोखरा (नेपाळ) येथे झालेल्या सातव्या आंतरराष्ट्रीय मास्टर्स जलतरण व अॅथलेटिक्स स्पर्धेत औरंगाबादच्या राजेश भोसलेने शानदार कामगिरी करत एकूण ३ पदके जिंकली. यात २ सुवर्ण व १ कांस्यपदकाचा समावेश आहे. ५० ते ५५ वयोगटात देशाचे प्रतिनिधित्व करताना लांब पल्ल्याचे जलतरणपटू राजेशने ८०० मीटर फ्रीस्टाइल व १५०० फ्रीस्टाइल प्रकारात सुवर्णपदक आपल्या नावे केले. नेपाळ व कतारच्या जलतरणपटूंना मागे टाकत सुवर्ण यश संपादन केले. अॅथलेटिक्समध्ये थाळीफेक प्रकारात राजेश भोसलेला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. राजेश हे जिल्हा परिषद शाळेत क्रीडा शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. यशस्वी कामगिरीबद्दल जिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश मीना, एमजीएमचे अंकुशराव कदम, मनपा अतिरिक्त आयुक्त रवींद्र निकम, विभागीय उपसंचालक अनिल साबळे, शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण, सुनीता सोहळे, अनिता व्याहाळकर, पंकज भारसाखळे आदींनी अभिनंदन केले.

बातम्या आणखी आहेत...