आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादच्या सर्पोद्यानाला 26 वर्षे पूर्ण:13 जातींच्या सापाचा अधिवास, दर महिन्याला 15 हजार पर्यटक, शालेय विद्यार्थी देतात भेट

औरंगाबाद14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

हैदराबाद येथील नेहरू राष्ट्रीय उद्यानात सर्प उद्यानाच्या प्रतिकृतीनुसार सिद्धार्थ उद्यान व प्राणीसंग्रहालयात 1996 मध्ये सर्पोद्यानाची निर्मिती करण्यात आली. यामध्ये पहिले 10 व आता 13 प्रकारच्या विविध जातींचे साप येथे ठेवण्यात आले आहेत. दर महिन्याला 15 हजार पर्यटक, शालेय विद्यार्थी सर्पोद्यानाला भेट देऊन विषारी, बिनविषारी सापाचे निरीक्षण करून माहिती घेतात. मनातील भिती व सापांविषयीचे गैरसमाज दूर करणे व सुरक्षितता कशी बाळगली पाहिजे, याविषयी ज्ञान घेण्यासाठी सर्पाेद्यान महत्त्वाची भूमिका निभावत आहे.

दरवर्षी प्रमाणे यंदाही श्रावण महिन्यातील पहिलाच सण नागपंचमी उत्सव घरोघरी सापाचे चित्र काढून, वारूळाची पुजा अर्चना करून साजरा केला जाईल. साप दिसताच अंगाचा थरकाप होतो. त्यांना मारण्यासाठी हातात काठी घेतली जाते. मात्र पर्यावरणाच्या दृष्टीने साप अत्यंत महत्त्वाचे आहेत, याविषयी फारसे जाणून घेतले जात नाही. परिणामी सापांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. त्यांचा अधिवासही धोक्यात आला आहे. त्यामुळे रानावनात, अभयारण्यातही सापांचे दर्शन दुर्लभ झाले आहे. शालेय पुस्तकातील चित्रे बघून सापांविषयी माहिती घ्यावी लागते. मात्र, जोपर्यंत प्रत्यक्ष साप बघितले जात नाही तोवर वास्तविक ज्ञान मिळत नाही.

सात फण्यांच्या नागाचे दृश्य

मराठवाड्यातील एकमेव सिद्धार्ध प्राणीसंग्रालयात 26 वर्षांपूर्वी 3500 स्क्वेअर फुट जागेत अतिशय सुंदर सर्पोद्यानाची निर्मिती करण्यात आली आहे. प्रवेशद्वारावरच सात फण्यांच्या नागाचे दृश्य बघून अंगावर शहारे येतात. तर आतमध्ये प्रवेश करताच विविध 13 जातींचे विषारी व बिनविषारी साप लक्ष वेधून घेतात. त्यांच्या विषयी माहिती जाणून घेण्याची पर्यटकांना, शालेय विद्यार्थ्यांना जिज्ञासा असते. सापांची पुजा करून चालणार नाहीतर सापांना वाचवण्यासाठी सर्वांच्या पुढाकाराची नितांत गरज असल्याची शिकवण येथे मिळते.

अन्नसाखळीत सापांचे महत्त्व

उंदीर, ससे, किडे आदी खाऊन साप निसर्गाच्या अन्नसाखळीत समतोल राखतो. शेतमालाचे नुकसान होण्यापासून साप वाचवतात. मात्र, साप दिसताच मारले जातात. त्यामुळे त्यांची संख्या वेगाने कमी झाली आहे.

सापाचे प्रकार संख्या

अजगर 4

नाग 21

धामण 20

तस्कर 5

गवत्या 5

धूळ नागीण 5

कंदोर 6

मांडूळ 2

घोणस 13

पाणसर्प 19

एकुण 100

100 प्रकारचे साप ​​​​​

3500 स्क्वेअर फुट जागेत सर्पाेद्यानाची निर्मिती करण्यात आली आहे. एकुण 14 गाळे असून त्यात 100 विविध प्रकारचे साप आहेत. दर मंगळवारी बेंडूक, उंदीर, कोंबड्यांची पिल्ले, ससे आदी खाद्य दिले जाते. दर माह सरासरी 15 हजार तर वर्षभरात 5 लाखांवर पर्यटक, शालेय विद्यार्थी भेट देऊन सापांविषयी निरीक्षण व उपयुक्त माहिती घेऊन जातात. पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त राहुल सूर्यवंशी यांनी ही प्रतिक्रिया दिली.

बातम्या आणखी आहेत...