आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:औरंगाबादचे 15 हजार रुपयांचे व्हेंटिलेटर तांत्रिक परीक्षेत पास; एमआयडीसीत लवकरच उत्पादनही

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • विशाखापट्टणम येथील मेड व्हॅली इन्क्युबेशन सेंटरमध्ये झाल्या चाचण्या

येथील ‘या शिका’ संघटनेने पुढाकार घेऊन सुरू केलेल्या कमी दरात व्हंंेटिलेटर निर्मितीच्या प्रयत्नांना यश आले आहे. विशाखापट्टणम येथील मेड व्हॅली इन्क्युबेशन सेंटरमध्ये या व्हेंटिलेटरच्या चाचण्या झाल्या. हे व्हेंटिलेटर वैद्यकीय कार्यात वापरण्यासाठी योग्य असल्याचे पत्र सेंटरकडून मिळाले आहे. आता औरंगाबादेतील एमआयडीसीत याचे उत्पादन सुरू होणार असून व्हेंटिलेटरची किंमत १५ हजार रुपयांपर्यंत असेल, अशी माहिती ‘या शिका’ संस्थेचे प्रमुख विकास चैतन्य यांनी दिली. पुण्यातील कॅप्टन भरुचा यांनी तयार केलेले एक व्हेंटिलेटर औरंगाबादचे विकास चैतन्य व पुण्यातील अभियंते अशोक सराफ यांना दिले होते. त्याला विकसित करून भरुचा पॅटर्नचे नवे व्हेंटिलेटर तयार करण्यात आले. त्याचे प्रोटोटाइप हे आंध्र प्रदेश मेड टेकझोन या संस्थेकडे दिले होते. कांचन पीसीबी प्रोडेक्ट, टूल टेक टूलिंग, लेसो कार्ट आणि शिवम इंडस्ट्री या चार प्रमुख कंपन्याच्या सहकार्याने हे व्हेंटिलेटर तयार करण्यात आले आहे. सध्या ६ व्हेंटिलेटर विविध रुग्णालयांत प्रत्यक्ष चाचणीस दिले आहेत. औरंगाबाद, किनवट, दौंड या शहरांत प्रत्यक्ष वापर करण्यात येणार आहे.

तत्काळ मदतीसाठी महत्वाचे

या व्हेंटिलेटरची किंमत १५ हजार रुपयांपर्यंत असेल, अशी माहिती विकास चैतन्य यांनी दिली. रुग्णालयांना परवडावे या हेतूनेचे ते तयार केले आहे. प्राथमिक अवस्थेत याचा वापर होऊ शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. तत्काळ मदतीसाठी हे व्हेंटिलेटर महत्त्वाचे आहे. ग्रामीण भाग वा वैद्यकीय सुविधांची वानवा असलेल्या ठिकाणी ते जीवनदान देणारे ठरेल.

सर्वसामान्यांना परवडण्यासाठी निर्मिती

देशाला मोठ्या प्रमाणावर व्हेंटिलेटरची गरज पडू शकते. सर्वसामान्यांना परवडेल ही गोष्ट डोक्यात ठेवून आम्ही तयारी सुरू केली. शहरातील सर्व तरुण उद्योजकांनी यासाठी मदत केली. आणि आमच्या सगळ्या प्रयत्नांना यश मिळाले. - विकास चैतन्य, संचालक, या शिका, औरंगाबाद

बातम्या आणखी आहेत...