आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्राचा मुलामुलींचा बास्केटबॉल संघ जाहीर:औरंगाबादच्या विपुल, खुशीची संघात निवड; गुजरातला होणार राष्ट्रीय स्पर्धा

औरंगाबाद17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महा बास्केटबॉल असोसिएशन यांच्या वतीने मराठवाडा सांस्कृतीक मंडळाच्या मैदानावर घेण्यात आलेल्या राज्य संघ निवड चाचणी व शिबिरातून 24 सदस्यीय मुलामुलींच्या महाराष्ट्र संघाची निवड करण्यात आली. शनिवारी (10 सप्टेंबर) राज्य संघटनेचे सचिव शत्रुघ्न गोखले यांनी ही माहिती महाराष्ट्राच्या संघात औरंगाबादच्या विपुल कड व खुशी डोंगरे यांना संधी मिळाली आहे. हे दोघेही मराठवाड्यातील पहिले आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल खेळाडू आहेत.

राष्ट्रीय स्पर्धा कधी?

बास्केटबॉल फेडरेशनच्या वतीने 13 ते 16 सप्टेंबरदरम्यान भावनगर (गुजरात) येथे राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत महाराष्ट्राचे दोन्ही संघ सहभागी होतील. संघ 11 सप्टेंबर रोजी औरंगाबादवरुन मुंबई तसेच मुंबई वरुन गुजरातला रवाना होणार आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राच्या पुरुष संघाच्या प्रशिक्षकपदी औरंगाबादचे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक गणेश कड आणि पुरुष संघाच्या प्रशिक्षकपदी मनजीत सिंग दरोगा व सचिन तत्तापुरे यांची राज्य संघटनेतर्फे नियुक्ती करण्यात आली आहे.

संघटनेने दिल्या शुभेच्छा

संघात निवड झालेल्या खेळाडूंचे महा बास्केटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. धनंजय वेळूकर, सचिव शत्रुघ्न गोखले, कोषाध्यक्ष जयंत देशमुख, एमएसएमचे सचिव हेमंत पातुरकर, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त डॉ. मकरंद जोशी, एमएसएम बास्केटबॉल स्पोर्ट्स असोसिएशनच्या उपाध्यक्ष मंदा कड, बिजली आंब्रे, सहसचिव प्रशांत बुरांडे, कोषाध्यक्ष विश्वास कड, सदस्य पूजा दुतोंडे, विवेक देशमुखसह औरंगाबाद जिल्हा व तालुका बास्केटबॉल संघटनेतर्फे आदींनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

महाराष्ट्राचे बास्केटबॉल संघ :

महिला संघ - साक्षी पांडे, सारा होरा, सिया देवधर, आर्या रिसवाडकर, दुर्गा धर्माधिकारी, आभा लाड, आदिती काळे, खुशी डोंगरे, सुजन पिंतो, पूर्वी महाले, अंशिका कनोजिया, करिना सूर्यवंशी. मुख्य प्रशिक्षक के. एम. निजार अहमद, प्रशिक्षक गणेश कड, संघ व्यवस्थापिका मंदा कड.

पुरुष संघ - सिद्धांत शिंदे, एडविन अरविंन, पार्थ शर्मा, राज कालभोर, आरोन मॉन्टेरिओ, विपुल कड, सय्यद मोहम्मद युसुफ, समीर कुरेशी, शुभम यादव, किसले राय, साहिल कराळे, यश माने. मुख्य प्रशिक्षक मनजीतसिंग दारोगा, प्रशिक्षक सचिन तत्तापुरे, संघ व्यवस्थापक तौफिक खान.

बातम्या आणखी आहेत...