आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या सूचनेवरून शनिवार, रविवार पेट्रोल पंप बंदचा निर्णय पेट्रोल पंप डीलर्स असोसिएशनने घेतला. त्यामुळे शनिवारी (२७ मार्च) हजारो वाहनचालकांचे प्रचंड हाल झाले. काही पंपांवर वादावादी झाली. राज पेट्रोल पंपासमोर तर वाहनचालकांनी रास्ता रोको केला. त्यांना पोलिसांनी हुसकावून लावले. मंगळवारी (१६ मार्च) जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्तांच्या आदेशाने अंशत: लॉकडाऊन जाहीर झाला. त्यात सोमवार ते शुक्रवार रात्री ८ ते पहाटे ५ वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवेतील यंत्रणांनाच ओळखपत्र दाखवल्यावर इंधन मिळेल, असे जाहीर करण्यात आले. तसेच शनिवार, रविवारी दिवसभर पंप बंद ठेवा असे आदेश २२ मार्च रोजी जिल्हा पुरवठा अधिकारी दत्ता भारजकर, भारत पेट्रोलियमचे जिल्हा समन्वयक विकास रंजन तसेच अन्न धान्य वितरण अधिकारी आर. के. मेंडके यांनी पेट्रोल पंपचालकांना सांगितले.
त्याची अंमलबजावणी झाली नाही. म्हणून तीन पंप सील करण्यात आले. शिवाय भारजकर यांना नोटीस बजावली. भारजकरांनी पुन्हा पंपचालकांना इशारा दिला. त्यामुळे शनिवारी सर्व पंप बंद ठेवण्यात आले. त्याची माहिती पंपचालकांच्या असोसिएशनने दिल्यावर त्याच्या बातम्याही प्रसिद्ध झाल्या. पण त्याकडे अनेकांनी दुर्लक्ष केले. परिणामी त्यांना फटका बसला. बहुतांश पंपांवर वाहनचालक, कर्मचाऱ्यांमध्ये वादावादी झाली. दुपारी दोननंतर पोलिसांनाही हस्तक्षेप करावा लागला. दरम्यान, पंढरपूर येथील रिलायन्सचा पंप सील करण्यात आला. हर्सूल टी पॉइंट येथील एचपी पंप सील करण्यात आला होता. तरीही चालकाने कोविडमुळे पंप बंद असल्याची चुकीची माहिती देणारा फलक लावला होता.
भारजकर म्हणाले की, जिल्हाधिकारी आणि पोलिस आयुक्तांच्या आदेशानुसार अत्यावश्यक सेवेसाठीच इंधन उपलब्ध राहणार आहे. तर पेट्रोल पंप डीलर्स असोसिएशनचे सचिव अखिल अब्बास म्हणाले की, बंधने लादल्याने नवे संकट उभे राहिले. या संदर्भात आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. लॉकडाऊनची भीती आणि सोमवारी धूलिवंदनाची सुटी असल्याने अनेक जणांनी शुक्रवारी जास्तीचे पेट्रोल भरून घेतले. त्यामुळे स्टॉक संपला. त्यातच तीन पंप सील केल्याने अडचण झाली. टीव्ही सेंटर आणि चिकलठाणा येथील पोलिस दलाचे पंप सुरू ठेवावेत, अशी आमची मागणी आहे. अनेक पंपांवर वादावादी, राज पेट्रोल पंपासमोर रास्ता रोको, पोलिसांनी हुसकावून लावले
शहरातील सर्व पेट्रोल पंप बंद असल्याने हजारो वाहनचालकांचे हाल; वाहनधारकांनी गोंधळ सुरू केल्याने पंपमालकांना पोलिसांना आचारण करावे लागेलकोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या सूचनेवरून शनिवार, रविवार पेट्रोल पंप बंदचा निर्णय पेट्रोल पंप डीलर्स असोसिएशनने घेतला. त्यामुळे शनिवारी (२७ मार्च) हजारो वाहनचालकांचे प्रचंड हाल झाले. काही पंपांवर वादावादी झाली. राज पेट्रोल पंपासमोर तर वाहनचालकांनी रास्ता रोको केला. त्यांना पोलिसांनी हुसकावून लावले. मंगळवारी (१६ मार्च) जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्तांच्या आदेशाने अंशत: लॉकडाऊन जाहीर झाला. त्यात सोमवार ते शुक्रवार रात्री ८ ते पहाटे ५ वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवेतील यंत्रणांनाच ओळखपत्र दाखवल्यावर इंधन मिळेल, असे जाहीर करण्यात आले. तसेच शनिवार, रविवारी दिवसभर पंप बंद ठेवा असे आदेश २२ मार्च रोजी जिल्हा पुरवठा अधिकारी दत्ता भारजकर, भारत पेट्रोलियमचे जिल्हा समन्वयक विकास रंजन तसेच अन्न धान्य वितरण अधिकारी आर. के. मेंडके यांनी पेट्रोल पंपचालकांना सांगितले.
त्याची अंमलबजावणी झाली नाही. म्हणून तीन पंप सील करण्यात आले. शिवाय भारजकर यांना नोटीस बजावली. भारजकरांनी पुन्हा पंपचालकांना इशारा दिला. त्यामुळे शनिवारी सर्व पंप बंद ठेवण्यात आले. त्याची माहिती पंपचालकांच्या असोसिएशनने दिल्यावर त्याच्या बातम्याही प्रसिद्ध झाल्या. पण त्याकडे अनेकांनी दुर्लक्ष केले. परिणामी त्यांना फटका बसला. बहुतांश पंपांवर वाहनचालक, कर्मचाऱ्यांमध्ये वादावादी झाली. दुपारी दोननंतर पोलिसांनाही हस्तक्षेप करावा लागला. दरम्यान, पंढरपूर येथील रिलायन्सचा पंप सील करण्यात आला. हर्सूल टी पॉइंट येथील एचपी पंप सील करण्यात आला होता. तरीही चालकाने कोविडमुळे पंप बंद असल्याची चुकीची माहिती देणारा फलक लावला होता.
भारजकर म्हणाले की, जिल्हाधिकारी आणि पोलिस आयुक्तांच्या आदेशानुसार अत्यावश्यक सेवेसाठीच इंधन उपलब्ध राहणार आहे. तर पेट्रोल पंप डीलर्स असोसिएशनचे सचिव अखिल अब्बास म्हणाले की, बंधने लादल्याने नवे संकट उभे राहिले. या संदर्भात आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. लॉकडाऊनची भीती आणि सोमवारी धूलिवंदनाची सुटी असल्याने अनेक जणांनी शुक्रवारी जास्तीचे पेट्रोल भरून घेतले. त्यामुळे स्टॉक संपला. त्यातच तीन पंप सील केल्याने अडचण झाली. टीव्ही सेंटर आणि चिकलठाणा येथील पोलिस दलाचे पंप सुरू ठेवावेत, अशी आमची मागणी आहे. अनेक पंपांवर वादावादी, राज पेट्रोल पंपासमोर रास्ता रोको, पोलिसांनी हुसकावून लावले
फक्त सोमवारी पेट्रोल, डिझेल मिळेल
सामान्य वाहनचालकांना सोमवारी म्हणजे २९ मार्च रोजी पेट्रोल-डिझेल मिळेल. ३० मार्च ते ८ एप्रिलपर्यंत फक्त अत्यावश्यक यंत्रणांतील कर्मचारी, अधिकाऱ्यांना ओळखपत्र दाखवल्यास इंधन मिळणार आहे, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.