आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद कोरोना:शहरात मंगळवारी आणखी 24 रुग्ण वाढले, एकूण रुग्ण संख्या 321, आता तरी गांभीर्याने घ्या; डाॅक्टरांचे आवाहन

औरंगाबाद3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • एका ५५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

शहरात ‘कोरोना’बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मंगळवारी आणखी २४ रुग्ण आढळून आले असून एकूण रुग्णसंख्या 321 झाली आहे. यासोबतच एका ५५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला असल्यामुळे शहरात कोरोनाबाधित बळींचा आकडा ११ वर गेला आहे. २४ रुग्णांमध्ये २१ रुग्ण जयभीम नगर येथील तर एक अजब नगर, एक संजय नगर आणि एक बुद्ध नगर येथील आहे.

आता तरी गांभीर्याने घ्या; डाॅक्टरांचे आवाहन, घराबाहेर पडू नका

लाॅकडाऊनचा काळ काही नागरिकांनी फार गांभीर्याने घेतला नाही. मात्र आता पुढचे १० दिवस तरी गांभीर्याने घेऊन घरातच राहावे, असे आवाहन तज्ञ डाॅक्टर व प्रशासनाकडून केले जात आहे.

तत्पूर्वी सोमवारी विविध भागात १५ नवे रुग्ण सापडले. घाटी, सामान्य रुग्णालय व मनपाच्या काेविड सेंटरमधील ८ रुग्णांचा अहवाल सकाळच्या सत्रात तर ६ रुग्णाचा अहवाल सायंकाळच्या सत्रात पाॅझिटिव्ह अाला. यातील रविवारी रात्री मृत्युमुखी पडलेल्या ५५ वर्षीय काेराेनाबाधित व्यक्तीचा अहवाल साेमवारी पाॅझिटिव्ह अाला. शहरातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २९७ वर पोहोचली. यात एका पत्रकाराचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने शहरात खळबळ उडाली. कोरोनाबाधित रुग्णांमध्ये उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णांमध्ये ५६ टक्के पुरुष, तर ४४ टक्के महिला असल्याचे जिल्हा सामान्य रुग्णालयातर्फे सांगण्यात आले.