आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद:बहीण मानत आधी राखी बांधून घेतली, नंतर पाेलिस भरती ट्रेनिंगच्या बहाण्याने बलात्कार

औरंगाबाद21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बहीण मानून एका मित्राने दाेघींकडून राखी बांधून घेतली. त्यानंतर अल्पवयीन मुलीला बाहेर नेत तिच्यावर अत्याचार केला. ३१ ऑगस्ट रोजी घडलेल्या घटनेनंतर आई-वडील नसलेली मोठी बहीण तणावात होती. अखेर मित्रांच्या मदतीने तिने २ ऑगस्ट रोजी तक्रार दिल्यानंतर पुंडलिकनगर ठाण्यात रामदास ऊर्फ पल्या रामजी प्रसाद (२५, ह. मु. बंबाटनगर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. तेरा वर्षीय पीडिता १९ वर्षीय बहिणीसोबत राहते. अकरा वर्षांपूर्वी तिच्या आईचे, तर चार वर्षांपूर्वी वडिलांचे निधन झाल्याने दोघी निराधार झाल्या. नातेवाइकांनीही त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे शहरातील एका खासगी रुग्णालयात काम करून मोठी बहीण तिला सांभाळते. एक तरुण दोघींना बहीण मानतो. त्यामुळे २१ ऑगस्ट रोजी तो त्यांच्याकडे राखी बांधण्यासाठी जात असताना आराेपी रामदास देखील त्याच्याासेबत गेला. २४ ऑगस्ट रोजी रामदास पुन्हा एका मित्राला सोबत घेऊन तिच्या घरी गेला व रक्षाबंधनाच्या दिवशी मला वेळ मिळाला नाही. मी पण तुमचा भाऊ आहे, असे म्हणत त्याने विश्वास संपादन करत दोघींकडूनही राखी बांधून घेतली. भेट म्हणून मी तुम्हाला पोलिस भरतीची ट्रेनिंग देतो, असे म्हणाला.

३१ ऑगस्ट रोजी मोठी बहीण बाहेर गेल्यानंतर रामदास तेथे आला. पीडितेला त्याने ट्रेनिंगसाठी सोबत येण्यास सांगितले. मात्र, घरात मोठी बहिण नाही, असे म्हणून तिने नकार दिला. मात्र त्याने तिच्या मोठ्या बहिणीला फाेन करून तिला घेऊन जात असल्याचे सांगून पायी दर्गा चौकापर्यंत नेले. पाऊस येत असल्याने दाेघे आडोशाला थांबले. त्यानंतर एका कारला हात दाखवून अजय ठाकूर असे नाव घेत तो तिच्यासह कारमध्ये बसला. बायपास मार्गे पाटीलवाडा हॉटेलच्या समोरील परिसरात कार नेली. तेथील एका खोलीत आधीच दोघे बसलेले होते. त्यानंतर ट्रेनिंगसाठी मालिश आवश्यक असते, असे सांगताच पीडितेला संशय आला. तिने विरोध करून खोलीबाहेर जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने तिला पकडून तिच्यावर अत्याचार केला. नंतर तिला घरी आणून सोडले. घाबरलेल्या पीडितेने बहिणीला हा प्रकार सांगितला. त्यानंतर तिने तक्रार केली.

बातम्या आणखी आहेत...