आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करास्मार्ट सिटी बसकडून सुरू करण्यात आलेल्या महिला विशेष बस सुविधेचा पहिल्या दिवशी २५० महिलांना लाभ घेतला. या विशेष उपक्रमाचे महिलांकडून स्वागत करण्यात आले.पहिल्या टप्प्यात औरंगपुरा ते चिकलठाणा मार्गावरील बसचे सकाळी नऊ वाजता मुकुंदवाडी येथील स्मार्ट सिटी बस डेपोवर उद्घाटन करण्यात आले. स्मार्ट सिटीच्या प्रकल्प व्यवस्थापक किरण आढे, मीडिया विश्लेषक अर्पिता शरद, लेखापाल भाग्यश्री जाधव यांच्या हस्ते या बसचे उद्घाटन झाले. ही बस सकाळी ९.३० ते ६.३० वाजेपर्यंत या मार्गावर उपलब्ध राहील.
दररोज औरंगपुरा ते चिकलठाणापर्यंत तर चिकलठाणा ते औरंगपुरापर्यंत ५-५ फेऱ्या असणार आहेत. शहरात फेब्रुवारी महिन्यात जी-२० परिषदेअंतर्गत विमेन-२० ची महत्त्वाच्या विषयावर बैठक होणार आहे. या पार्श्वभूमीवर एक सांकेतिक पाऊल म्हणून या बस सेवेची सुरवात करण्यात येत आहे, अशी माहिती स्मार्ट शहर बसचे मुख्य चालन व्यवस्थापक राम पावनीकर यांनी दिली. जसजसा प्रतिसाद मिळेल, त्यानुसार महिलांसाठीच्या बसची संख्या वाढविण्यात येईल, असे या वेळी सांगण्यात आले. दरम्यान बुधवारी दिवसभरात अडीचशेपेक्षा जास्त महिलांनी बसमधून प्रवास केला, असे स्मार्ट सिटीतर्फे सांगण्यात आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.