आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबादेत आज संध्याकाळी पुन्हा आणखी 8 रुग्णांची वाढ झाली. याआधी आज सकाळी 17 कोरोना रुग्ण आढळून आले होते. सकाळी आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मुकुंदवाडीतील 16 तर बायजीपुरा येथील एक रुग्ण आहे. शुक्रवारी 39 शनिवारी 40 आणि रविवारी 25 असे तीन दिवसांत एकूण 104 रुग्ण वाढले. शहरातील रुग्णांचा आकडा आता 285 वर पोहोचला आहे.
संजयनगरमध्ये सर्वाधिक रुग्णांची संख्या वाढली आहे, तर नव्याने अनेक हॉटस्पॉट सापडले आहेत. शुक्रवारी गारखेडा परिसरातील गुरुदत्तनगर येथील ४७ वर्षीय वाहनचालक रुग्णाचा मृत्यू झाला. ५० वर्षांखालील तो पहिला मृत्यू ठरला आहे. या रुग्णास ७ दिवसांपासून ताप, कोरडा खोकला आणि ४ दिवसांपासून श्वास घेण्यास त्रास होत होता. शनिवारी नूर कॉलनीतील ६५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. शहरातील हा नववा बळी ठरला. या महिलेला २ मे रोजी घाटीत दाखल केले होते. मधुमेह, रक्तदाब या आजाराने ग्रासलेली महिला शनिवारी मृत्युमुखी पडली.
औरंगाबाद जिल्हा : हिरापूर येथील जवानाला बाधा
मालेगावातील बंदोबस्तावरून करमाडजवळील हिरापूर (ता. औरंगाबाद) येथील एसआरपीएफचा जवान सुटीवर घरी आला होता. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्याच्या सर्वच कुटुंबीयांना चिकलठाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. हिरापूर गाव सील केले असून ड्रोन कॅमेऱ्याच्या साह्याने लक्ष ठेवले जात आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.