आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगजेब एमआयएमचा कोण लागतो:अंबादास दानवेंचा सवाल; एमआयएम म्हणजे निजामांचा वारसा चालवणारा पक्ष- शिरीष बोराळकर

छत्रपती संभाजीनगर l मयूर वेरूळकर22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

छत्रपती संभाजीनगरचे औरंगाबाद हे नाव असावे, यासाठी एमआयएमकडून आंदोलन सुरू करण्यात आले आहे. काही धर्मांध जातीवादी संघटना ह्या औरंगजेब व निजामाचा वारसा चालवत आहेत, औरंगजेब एमआयएमचा कोण लागतो, त्याची विचारसरणी एमआयएम मान्य करते का असा सवाल विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि भाजपचे शहराध्यक्ष शिरीष बोराळकर यांनी 'दिव्य मराठी'शी बोलताना उपस्थित केला आहे.

विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले की, एमआयएम ही संघटना छत्रपती संभाजीनगर नावाच्या विरोधात काम करते. एमआयएमचा औरंगजेब कोण लागतो असा, त्याची विचारसरणी एमआयएमला मान्य आहे का असा सवाल त्यांनी 'दिव्य मराठी'शी बोलताना उपस्थित केला आहे.

अंबादास दानवे पुढे बोलताना म्हणाले की, बाळासाहेब ठाकरेंनी जिल्ह्यातील जनतेची भावना लक्ष्यात घेऊन नामांतर करावे अशी भूमिका मांडली आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी या शहराचे नामांतर केले, त्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारच्या निर्णयाचे केंद्र सरकारकडून मान्यता दिली आहे. त्यांचे सर्व जिल्ह्यातील लोकांनी स्वागत केले आहे. मात्र, एमआयएमकडून शहरात जातीयवाद पसरवला जातोय असा आरोप दानवे यांनी केला आहे. एमआयएमला उत्तर देण्यासाठी आम्ही शिवसेना म्हणून सक्षम असल्याचे अंबादास दानवे यांनी 'दिव्य मराठी'शी म्हटले आहे.

भाजपचे शहराध्यक्ष शिरीष बोराळकर म्हणाले की, महाराष्ट्र शासनाने शिंदे-फडणवीस सरकारने, शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर केले. त्यामुळे काही धर्मांध जातीयवादी संघटना ह्या औरंगजेब व निजामाचा वारसा आहेत, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. दरम्यान एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांचा शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर झाले म्हणून नामांतराने त्यांचा तिळपापड झाल्याचा टोला देखील त्यांनी लगावला आहे. एमआयएमच्या उपोषणस्थळी क्रूरकर्मा छत्रपती संभाजी महाराजांना हाल हाल करून मारणाऱ्या औरंगजेबाचे पोस्टर झळकवले व आम्ही त्याचे वारस आहोत या पद्धतीने त्या ठिकाणी वातावरण निर्मिती करण्यात आली अशी टीका शिरीष बोराळकर यांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...