आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोयीस्कर दुर्लक्ष:मेट्रोच्या आराखड्यातून ऑरिक सिटीस वगळले ; बागडेंच्या सूचनेकडेही सोयीस्कर दुर्लक्ष

औरंगाबाद25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेंद्रा ते वाळूज एमआयडीसीदरम्यान २८ किमी डबल डेकर उड्डाणपूल व मेट्रोचा आराखडा तयार केला आहे.मात्र यातून ऑरिक सिटीला वगळण्यात आले आहे. एकीकडे समृद्धी महामार्गाला ऑरिक सिटीची कनेक्टिव्हिटी देण्याची तयारी केली जात आहे. मग दुसरीकडे मेट्रोपासून दूर का ठेवले जात आहे, असा त्यांचा सवाल आहे. आमदार हरिभाऊ बागडे यांनी बैठकीत ऑरिक सिटीचा मुद्दा मांंडला होता, पण त्याकडे सर्वांनीच सोयीस्कर दुर्लक्ष केले.

शेंद्रा ते वाळूजदरम्यान २८ किमी उड्डाणपूल व मेट्रो मार्गाची उभारणी होणार आहे. सोमवारी या आराखड्याचे सादरीकरण झाले. शेंद्रा एमआयडीसीच्या गेट क्रमांक एकपासून मेट्रो धावेल.या एमआयडीसीला लागूनच ऑरिक सिटी आहे. ऑरिकमध्ये दीडशेपेक्षा जास्त उद्योगांनी गुंतवणूक केली आहे. शेंद्रा ते करमाडपर्यंत ऑरिक सिटीचे जाळे असणार आहे. करमाडच्या रोहिदासनगरजवळ ऑरिक सिटीचे पहिले गेट आहे. मात्र केवळ सहा किमी अंतर वाढत असल्याने मेट्रोतून ऑरिक सिटीला वगळण्यात आल्याचे दिसून येते.

बातम्या आणखी आहेत...