आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी ओरिजिनल:देशातील पहिले स्मार्ट औद्योगिक शहर 'ऑरिक'मुळे औरंगाबादच नव्हे तर मराठवाड्याचा चेहरामोहरा बदलणार

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वीलेखक: महेश जोशी
  • कॉपी लिंक

देशातील पहिले स्मार्ट औद्योगिक शहर "ऑरिक'मुळे औरंगाबादच नव्हे तर मराठवाड्याचा चेहरामोहरा बदलेल, असे बोलले जाते. दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरअंतर्गत (डीएमआयसी) ऑरिक’मध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे पायाभूत सुविधांची निर्मिती केली आहे. एकूण ५.५ लाख रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट आहे. मात्र आजवरच्या ५,५०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून अवघे ५,९०९ रोजगार तयार होऊ शकले. म्हणजेच सरासरी ९३.०७ लाखांच्या गुंतवणुकीमागे केवळ एकच रोजगार निर्माण झाला. राज्याचा २०२१-२२ आर्थिक पाहणी अहवालात ही माहिती दिली आहे. औरंगाबादेत एनआयसीडीसी व एमआयडीसीत "औरंगाबाद इंडस्ट्रिअल टाऊनशिप लिमिटेड' ही स्पेशल पर्पज व्हेईकल आहे. "ऑरिक' हे त्याचेच ब्रँड नेम आहे. मोठ्या उद्योगांअभावी हा प्रकल्प पांढरा हत्ती ठरण्याची शक्यता आहे.

ऑरिकचा विस्तार : एकूण 4,039 हेक्टर क्षेत्रात
- 7,947 कोटी रुपयांचा निधी केंद्राने शेंद्रा-बिडकीन औद्योगिक क्षेत्रात पायाभूत सुविधांच्या विकासासाठी मंजूर केलेला आहे.
- 1837 हेक्टर क्षेत्र विकसित नोव्हेंबर २०२१ पर्यंत. शेंद्र्यात ८३९ हेक्टर, बिडकीनमध्ये १,००६ हेक्टर.
- ३३७ एकरांवरील १२६ भूखंडांचे वितरण करण्यात आले. या उद्योगांनी येथे ५५०० कोटींपेक्षा अधिक गुंतवणूक केली असून त्यातून ५९०९ रोजगार निर्माण झाले.

आता गरज एका मोठ्या अँकर प्रकल्पाची, त्यातून बदलेल चित्र
ऑरिकमध्ये गुंतवणुकीच्या प्रमाणात रोजगार वाढवण्यासाठी एका अँकर प्रोजेक्टची गरज आहे. असा मोठा प्रकल्प आला तर सुटे भाग पुरवणाऱ्या सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांची गरज भासेल. त्याची पूर्तता करताना या उद्योगांत मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी निर्माण होईल.

ऑरिकमध्ये या प्रमुख कंपन्या
ह्युसंग कॉर्पोरेशन, एनएलएमके, एंड्युरेन्स, आयनॉक्स एअर प्रॉॅडक्टस, जपानची फ्युजी सिल्वरटेक, कोअॅटॉल फिल्म्स, तोशिवा, अॅरो टूल्स, वरद अॅलाय कास्टिंग, एसीजी, कॅटरपिलर समूहाची पर्किन्स आदी.

या उद्योगांनी फिरवली पाठ
मोठ्या श्रेणीतील ८ ते १० उद्योगांनी यापूर्वीच ऑरिककडे पाठ फिरवली आहे. यात प्रामुख्याने ह्युंदाई मोटार्स, किया मोटार्स, इंग्लंडमधील देलारू, प्रीमियम ट्रान्समिशन, नेस्ले आदींचा समावेश आहे.

ऑरिक सिटीमध्ये नवनवीन उद्योग आणण्यासाठी प्रशासकीय सोबतच दांडगी राजकीय इच्छाशक्तीही आवश्यक आहे. उद्योजकांच्या संघटना सातत्याने उद्योगांनार त्या तुलनेत राजकीय पातळीवर फारशा हालचाली होताना दिसत नाहीत.

बातम्या आणखी आहेत...