आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ग्रामीणमध्ये संसर्ग वाढला:औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाचे नवे 1458 रुग्ण, 30 जणांचा मृत्यू;  97,198 कोरोनामुक्त, 15,022 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • घाटीत रोजच रुग्णसंख्या वाढत असल्याने एकाच स्ट्रेचरवरून दोघांना नेण्याची वेळ येत आहे.
  • दिवसभरात १४३३ जणांना काेराेनामुक्त झाल्याने सुटी

जिल्ह्यात गुरुवारी १४५८ रुग्ण आढळले आहेत. यात शहरातील ६१२ तर ग्रामीण भागातील ८४६ रुग्णांचा समावेश अाहे. २४ तासांत एकूण ३० जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या १,१४,४९५ झाली तर बळींचा अाकडा २२७५ वर गेला अाहे. गुरुवारी १४३३ जणांना (मनपा ७४०, ग्रामीण ६९३) सुटी देण्यात आली. आजपर्यंत ९७,१९८ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. १५,०२२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

घाटीत २६ जणांचा मृत्यू
अाैरंगाबाद जिल्ह्यातील २० जणांचा व इतर जिल्ह्यांतील सहा जणांचा घाटीत उपचारादरम्यान मृत्यू झाला. यात हिंगोली, बीडचे प्रत्येकी एक, नगर व जालन्याचे प्रत्येकी दाेघे अाहेत. जिल्हा रुग्णालय एक आणि खासगी रुग्णालयांत तीन काेराेना रुग्णांनी अखेरचा श्वास घेतला.

ग्रामीण भागात ८,१३३ अॅक्टिव्ह रुग्ण
ग्रामीण भागात कोरोना रुग्णांचे आकडे शहरांपेक्षा जास्त वाढले आहेत. २१ एप्रिलपर्यंत ३८,३२० रुग्ण बाधित झाले त्यापैकी २९,४४० कोरोनामुक्त झाले तर ८,१३३ रुग्णांवर सध्या उपचार सुरू असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर शेळके यांनी सांगितले. औरंगाबाद तालुक्यात सर्वाधिक ९,७०७, गंगापूर ६,७५५, वैजापूर- ६,०७३, पैठण- ४,९८८, कन्नड- ४,५९६, सिल्लोड- २,८०७, फुलंब्री- १,५५० आणि खुलताबाद, सोयगाव तालुक्यांमध्ये प्रत्येकी ९२२ रुग्णांची नाेंद झाली. वर्षभरात ग्रामीण भागातील ७४७ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. यात गंगापूर तालुक्यातील सर्वाधिक १४१ रुग्ण हाेते.

होम आयसोलेशनमधील ५९ रुग्ण गंभीर
सौम्य लक्षणे असलेल्यांना होम आयसोलेशन करून त्यांच्यावर घरीच उपचार केले जात आहेत. मात्र अचानक गंभीर झाल्याने अशा ५९ रुग्णांना ऐनवेळी रुग्णालयात हलवावे लागत आहे, अशी माहिती मनपाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. मेघा जोगदंड यांनी दिली. अशा रुग्णांची मनपाच्या वॉर रूममधून कॉल करून नियमित विचारपूस केली जाते. अशा कॉलमधून आजवर ५९ रुग्णांनी होम आयसोलेशनमध्ये तब्येत बिघडल्यानंतर रुग्णालयांत भरती करण्यात आल्याची नोंद घेण्यात आली आहे, असे पालिकेतील कोरोना वॉर रूमच्या प्रमुख डॉ. मेघा जोगदंड यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...