आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाढता कोरोना:औरंगाबादेतील कोरोनाग्रस्त रुग्णसंख्या 239 वर, शनिवारी सकाळी आणखी 23 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर शहरात संचारबंदीचे नियम आणखीच कडक करण्यात आले

औरंगाबादमध्ये कोरोना बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. शनिवारी सकाळी आणखी 23 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यामध्ये नूर कॉलनी 5, बायजीपुरा 11, कैलास नगर 3, समता नगर 2, जयभीम नगर 1 येथील रुग्णांचा समावेश आहे. यासोबत शहरातली कोरोनाबाधितांचा आकडा 238 वर पोहोचला आहे. आतापर्यंत 25 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत तर 8 जणांचा मृत्यू झाला आहे. 

याआधी शुक्रवारी शहरात 39 नवीन रुग्ण आढळून आले होते, तसेच 76 टेस्टचे रिपोर्ट आले निगेटिव्ह आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली होती. दरम्यान शुक्रवारी आढळून आलेल्या या 32 रुग्णांमध्ये सर्वाधिक मुकुंदवाडीमध्ये 18, नूर कॉलनीमध्ये 3, वडगावमध्ये 1, आसेफीया कॉलनीमध्ये 3, भडकल गेट परिसरात 1, गुलाबवाडी पदमपुरा 2, सीटी चौक 1, मेहमुदपुरा 1 आणि भीमनगरमध्ये 2 रुग्ण आढळले आहेत. दरम्यान, या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर शहरात संचारबंदीचे नियम आणखीच कडक करण्यात आले आहे. मात्र तरीही काही नागरिक घराबाहेर पडतांना दिसून येत आहे. अशा नागरिकांवर पोलिस कारवाई करत आहेत. 

शुक्रवारी 47 वर्षीय रुग्णाचा मृत्यू

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात औरंगाबाद शहरातील गारखेडा परिसरातील गुरूदत्त नगर येथील 47 वर्षीय रुग्णास 27 एप्रिल रोजी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांचा आज सकाळी 6.20 मिनिटांनी उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे सध्या घाटीच्या डेडिकेटेड कोविड रुग्णालयात 11 कोविड रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

व्यवसायाने वाहन चालक असलेल्या गुरू दत्तनगर येथील या रूग्णास सात दिवसांपासून ताप, कोरडा खोकला आणि चार दिवसांपासून श्वास घेण्यास त्रास होत होता. संबंधित लक्षणे कोविड 19 आजाराची दिसत असल्याने त्यांना संशयित कोविड कक्षात भरती केले होते. तिथे त्यांच्या लाळेचे नमुने घेऊन चाचणीसाठी पाठविल्यानंतर तो अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर त्यांना कोविड कक्षात हलविण्यात आले. तिथे त्यांना कृत्रिम ऑक्सिजनवर ठेवण्यात आले होते. न्यूमोनिआ, श्वसन विकार असल्याने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, असेही घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, माध्यम समन्वयक डॉ. अरविंद गायकवाड यांनी कळविले आहे.

बातम्या आणखी आहेत...