आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जुनी पेन्शन योजना लागू करा:खाजगीकरण रद्द करा, अन्यथा तीव्र आंदोलन करणार; राज्य सरकारी कर्मचारी संघटना झाली आक्रमक

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जुन्या पेन्शन योजनेसाठी राज्य सरकारी कर्मचारी आक्रमक भूमिका घेत आहेत नुकतीच नवी दिल्लीत विविध मागण्यांसाठी केंद्रीय व राज्य कर्मचाऱ्यांचे अधिवेशन पार पडले यामध्ये जुनी पेन्शन योजना लागू करावी, कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत घ्यावे, खाजगीकरण रद्द करावे यासह सात मागण्यांसाठी आंदोलन करण्यात त्यानंतर पुढचा टप्पा म्हणून डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात पुन्हा एकदा राज्यात सरकारी कर्मचारी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे देविदास जरारे यांनी दिली आहे.

जुन्या पेन्शन योजनेसाठी राज्य सरकारी कर्मचारी सातत्याने आंदोलन करत आहेत मात्र केंद्र सरकार आणि राज्य सरकार जुन्या पेन्शन बाबतीत कुठलाही निर्णय घेत नसल्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यात मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला आहे या विरोधात सरकारी कर्मचारी पुन्हा एकदा आंदोलन करण्याच्या पवित्र आहेत.

देशव्यापी आंदोलनाचा इशारा

अखिल भारतीय राज्य सरकारी महासंघ केंद्रीय कर्मचारी व मजदूर फेडरेशनचे संयुक्त अधिवेशनात दिल्ली येथील ताल कटोरा स्टेडीयम मध्ये पार पडले.या अधिवेशनात देशभरातुन विविध राज्याचे केंद्र व राज्य सरकारी कर्मचा-यांचे पाच हजार पेक्षा जास्त पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.त्यानंतर आता हे आंदोलन आणखी तीव्र करण्यात येणार असल्याची माहिती देविदास जरारे यांनी दिली आहे. त्यासाठी आंदोलनाची टप्प्याटप्प्याने दिशा ठरवत देखील आल्याचे जरारे यांनी सांगितले. त्यानुसार डिसेंबर 2022 मध्ये संयुक्त मेळावे जानेवारी फेब्रुवारी 2023 मध्ये जिल्हा स्तरावर संयुक्त मेळावे मार्च/एप्रिल मध्ये तालुका स्तरावर मेळावे तसेच जुलै- ऑगस्ट मध्ये देशातील चारही बाजुने मोटार सायकल रॅली काढण्यात येईल सप्टेंबर 2023 मध्ये सर्व राज्यातील कर्मचारी दिल्ली येथे देशव्यापी भव्य रॅली काढण्यात येईल व त्याच सभेत बेमुदत संपाची घोषणा करण्यात येईल.

या संपात राज्य सरकारी कर्मचारी, जि.प. कर्मचारी महासंघ, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, चतुर्थश्रेणी कर्मचारी, कोतवाल, वाहनचालक संघटना वाहन चालक संघ, विमा, बँक, रेल्वे, पोस्ट, केंद्रीय अबकारी विभाग देखील संपात सहभागी होण्यासाठी प्रयत्न केले जातील.

बातम्या आणखी आहेत...