आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद जिल्ह्यातील 216 ग्रामपंचायतीचे निकाल काल जाहीर झाले. यात पैठण तालुक्यातील दोन मोठ्या ग्रामपंचायतीच्या निकालामुळे पालकमंत्री संदीनान भुमरे यांना धक्का बसला आहे. तर असाच एक एक निकाल पैठण तालुक्यातील हिरापूर थापटी तांडा ग्रुप ग्रामपंचायतीसाठी लागला आहे. हिरापूर थापटी तांडा ग्रुप ग्रमापंचयतीमध्ये एक संस्थाचालक हे सरपंच पदासाठी उभे होते. तर त्यांच्याच संस्थेतील शिपाई हा त्यांच्याविरोधात निवडणूक रिंगणात उतरला आणि विजयी देखील झाला यामुळे पैठण तालुक्यात या निकालाची जोरदार चर्चा सुरू झाली होती.
पैठणमधील संस्थाचालक कल्याण राठोड यांनी हिरापूर थापटी तांडा ग्रुप ग्रामपंचायतीच्रूा सरपंच पदासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र यानंतर त्यांच्या विरोधात त्यांच्याच संस्थेत शिपाई म्हणून काम करणारे विनोद बाबू राठोड यांनी शिवशाही ग्रामविकास पॅनेलकडून रिंगणात उडी घेतली. शेतकरी ग्राम विकास पॅनेलचे कल्याण राठोड संस्थाचालक यांना धोबिपछाड देत ग्रामपंचायतीवर जोरदार विजय मिळवला आहे. यामुळे परिसरात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
कल्याण राठोड यांच्या शेतकरी ग्राम विकास पॅनलचे दोन उमेदवार विजयी झाले आहेत. तर सरपंच म्हणून निवडून आलेले विनोद बाबू राठोड यांच्या शिवशाही ग्रामविकास पॅनेलचे 4 सदस्य निवडून आले आहेत. यामुळे शिवशाही पॅनलच्यावतीने गावात मोठ्या प्रमाणात जल्लोष करत त्यांचे स्वागत करण्यात आले.
मोठ्या ग्रामपंचायती ठाकरेंकडे
औरंगाबाद जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत आणि खुद्द जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या बिडकीन आणि आडूळमध्ये ग्रामपंचायतमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची यांची सत्ता आली आहे. आडुळ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी ठाकरे गटाचे बबन भावले, तर बिडकीन येथे अशोक धर्मे हे विजयी झाले आहेत. पैठण तालुक्यातील एकूण 22 ग्रामपंचायतीसाठी 94 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडली होती. यापैकी 16 ग्रामपंचायतीवर भुमरेंच्या समर्थकांची वर्णी लागली असली तरी 2 मोठ्या आणि इतर 4 ग्रामपंचायती त्यांच्या हातून गेल्याचे दिसून येते आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.