आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे आता हॉटेल आणि ज्यूस सेंटर पार्सल वगळता ग्राहकांसाठी बंद ठेवले जाणार आहेत. अर्थातच अशा ठिकाणी लोकांना आता बसून जेवण किंवा ज्यूसचा आस्वाद त्या ठिकाणी बसून घेता येणार नाही. सर्व हॉटेलमध्ये 30 एप्रिल पर्यत बसून जेवता येणार नाही. तसेच पार्सलची सुविधा फक्त आठ वाजेपर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिव्य मराठीशी बोलताना दिली आहे.
जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितल्याप्रमाणे, जिल्ह्यात रसवंतीवर लोक तसेच ज्यूस सेंटरवर गर्दी होताना दिसत आहे. त्यामुळे या रसवंती आणि ज्यूस सेंटरवर आता रस बसून घेता येणार नाही. त्यांना केवळ पार्सलची सुविधा देण्यात येईल. त्यामुळे रसवंती चालकांनी त्यांच्या खुर्च्या गोळा करून ठेवाव्या. त्यांना फक्त पार्सलची सुविधा सुरू ठेवता येणार आहे. याबाबत संध्याकाळी सविस्तर आदेश काढण्यात येणार आहेत. तसेच नियमावलीचा भंग केल्यास कडक कारवाई देखील करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
औरंगाबादमध्ये हॉटेल सुरू राहणार की नाही याबबत काही संभ्रम निर्माण झाला होता. मिशन बिगीन अगेन अंतर्गत नव्याने काही आदेश काढले होते. त्यामुळे संभ्रम वाढला होता. मात्र पुण्यात ज्याप्रमाणे फक्त पार्सल सुविधा हॉटेल्समध्ये आहे. त्याच पद्धतीने औरंगाबादमध्ये सुद्धा केवळ पार्सल सुविधा मिळणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.