आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबारावीत 60 टक्के गुण घेऊन उत्तीर्ण महिलांसाठी एअर इंडियात 'कॅबिन क्रू' म्हणून नोकरी करण्याची संधी आहे. थेट मुलाखतीद्वारे निवड होईल. दिल्ली, मुंबई आणि नागालँडच्या दिमापूर येथे 6,10,12 जानेवारी दरम्यान मुलाखती होतील.
18 ते 32 वयोगटातील उमेदवार ज्यांची उंची 155 सेमी असेल त्यांना पासपोर्ट, पॅनकार्ड, आधार कार्ड व आवश्यक कागदपत्रांसह प्रत्यक्ष मुलाखतीला हजर राहता येईल.
एअर इंडियाच्या विमानातील प्रवाशांना उड्डानाच्या वेळी सुरक्षेची काळजी घेण्याच्या संदर्भात डेमो देणे, सुरक्षा उपकरणांची कार्यक्षमता तपासणे, प्रवाशांना काही दुखापत झाल्यास त्यांची सुश्रूषा करणे, तातडीच्या वेळी उपाययोजना करणे, खाद्य-पेय पुरवणे, विविध सूचनांची घोषणा करणे, प्रवाशांच्या समस्यांचे निराकरण करणे आदी कामांसाठी एअर इंडियाने भरती प्रक्रिया सुरू केली आहे. कुठलाही अनुभव नसलेल्यांची वयोमर्यादा 18 ते 22 आहे. मात्र अनुभवी युवतींना दहा वर्ष शिथिलक्षम असेल. म्हणजेच 18 ते 32 पर्यंतच्या अनुभवींनाही संधी दिली जाणार आहे. बॉडी मास इंडेक्स (बीएमआय) 18 ते 22 दरम्यान असणे अनिवार्य आहे. अर्ज करण्यासाठी कुठल्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात येणार नाही. पासपोर्ट, पॅन, आधार कार्ड सोबत असावे. मुलाखतीला येताना रिज्युमे अपडेट असणे अनिवार्य करण्यात आले आहे.
दिल्ली : 6 जानेवारी
दिल्ली येथील एसेक्स फार्म्स, 4 अरबिंदो मार्ग, आयआयटी फ्लायओव्हर क्रॉसिंच्या समोर, हौस खास मेट्रो स्टेशनच्या बाजूला, नवी दिल्ली येथे सकाळी 9.30 ते 12.30 दरम्यान उपस्थित रहावे लागणार आहे.
मुंबई : 10 जानेवारी
स्केअर मार्ग, बी. एन. अग्रवाल कमर्शियल कॉम्प्लेक्स, विले-पार्ले, विले-पार्ले रेल्वे स्टेशनच्या शेजारी मुलाखती घेतल्या जातील. सकाळी 9.30 ते 12.30 पर्यंतची वेळ देण्यात आली आहे.
दिमापूर, नागालँड : 12 जानेवारी
हॉटेल अकासिया, इस्ट पोलिस स्टेशनच्या समोर, दिमापुर, नागालँड या पत्यावर सकाळी 9.00 ते दुपारी 12.00 पर्यंत मुलाखती घेतल्या जाणार आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.