आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लॉकडाऊनचा परिणाम:शुभ ‘लक्षणं’- रुग्ण घटल्याने मनपाचे 18 पैकी 5 कोविड केअर सेंटर रिकामे

औरंगाबाद11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
विद्यापीठातील छत्रपती शिवाजी महाराज मुलांच्या वसतिगृहात रुग्ण नसल्याने सध्या शुकशुकाट अाहे. - Divya Marathi
विद्यापीठातील छत्रपती शिवाजी महाराज मुलांच्या वसतिगृहात रुग्ण नसल्याने सध्या शुकशुकाट अाहे.
  • 3,689 पैकी 2,045 बेड रिकामे, 1,644 रुग्णांवर उपचार

मनपाने काेरोना संसर्ग झालेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी शहरात १८ कोविड सेंटर सुरू केले होते. मार्चअखेरीस आणि एप्रिलच्या पहिल्या दोन आठवड्यापर्यंत येथे रुग्णांना बेड मिळण्यासाठी मारामार करावी लागायची. मात्र अाता लाॅकडाऊन, वाढते लसीकरण या याेजनांमुळे शहरात काेराेनाची रुग्णसंख्या हळूहळू घटू लागली अाहे. त्यामुळे १८ पैकी ५ कोविड सेंटरमध्ये एकही रुग्ण नाही. मनपाने एकूण ३ हजार ६८९ रुग्णांची व्यवस्था केली होती. यापैकी २ हजार ४५ बेड सध्या रिक्त अाहते, तर फक्त १ हजार ६४४ जणांवरच उपचार करण्यात येत असल्याचे मनपाच्या शनिवारच्या अहवालावरून समोर आले.

फेब्रुवारीपासून काेराेनाच्या दुसऱ्या लाटेमुळे शहरात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत हाेती. यामुळे मनपाकडे असलेल्या उपाययोजना कमी पडत असल्याचे चित्र होते. मात्र शहरातील विविध भागात लसीकरणासह कोरोना टेस्ट वाढवल्यामुळे संसर्गाचाप्रार्दुभाव कमी होत असल्याचे दिसून येत आहेत. एप्रिलच्या पहिल्या अाठवड्यापर्यंत शहरात एक हजारपेक्षा जास्त रुग्ण आढळून येत होते. आता मात्र ही स्थिती आटोक्यात आली असल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत प्रशासनाकडून करण्यात आलेल्या उपाययोजनामुळे जास्तीचे रुग्ण वाढल्यास जास्तीचे कोविड सेंटरचे नियोजन करण्यात आले होते. मात्र रुग्णसंख्या घटल्याने मंगल कार्यालये ताब्यात घेण्याचा निर्णयही मनपाने रद्द केला अाहे. नव्याने सुरू असलेल्या हालचालीही थांबवल्या असल्याचे मनपाच्या सूत्रांनी सांगितले. अशी अाहे कोविड सेंटरची रुग्ण स्थिती (शनिवारपर्यंतची अाकडेवारी)

अशी आहे कोविड सेंटरची रुग्ण स्थिती सेंटरचे नाव क्षमता दाखल मेल्ट्रॉन कोविड सेंटर ३८० ३५७ एमजीएम स्पोर्ट््स कॉम्प्लेक्स १०० ५३ एमआयटी होस्टेल एक ३४५ २०० एमआयटी होस्टेल दाेन १७५ ९२ किलेअर्क बॉइज होस्टेल ३०० १७६ ईओसी पदमपुरा ७५ ६९ शाहू कॉलेज, कांचनवाडी १०० ८९ सिपेट २७० १९१ शा. अभियांत्रिकी कॉलेज ४५० १७२ पॉलिटेक्निक कॉलेज वसतिगृह १८० ०२५ सेंटरचे नाव क्षमता दाखल पीईएस कॉलेज १२५ ००० देवगिरी बॉइज होस्टेल ३०० ११२ देवगिरी गर्ल्स होस्टेल १८० ००० रमाई होस्टेल विद्यापीठ १२१ ०२१ यशवंत होस्टेल विद्यापीठ १८० ००० छत्रपती होस्टेल विद्यापीठ ०८६ ००० विभागीय क्रीडा संकुल २४० ०८७ संत तुकाराम होस्टेल ०८० ००० एकूण ३६८९ १६४४

रुग्ण नसले तरी कोविड सेंटर नेहमीच राहतील सज्ज काही कोविड सेंटरमध्ये एकही रुग्ण नाही. मात्र हे सेंटर मनपाकडून बंद करण्यात आले नाही. पुन्हा रुग्णसंख्या कमी जास्त झाल्यास तेथे रुग्ण शिफ्ट करता यावेत यासाठी त्यांना सुरू ठेवावे लागते. तिथला काही स्टाफ इतर कामांसाठी नियुक्त करण्यात आला आहे. - डॉ. नीता पाडळकर, मनपा आरोग्य अधिकारी

पाच सेंटरमध्ये रुग्ण नाही जेव्हा कोविड सेंटर सुरू केले होते त्या वेळी सर्वच सेंटरमध्ये रुग्णसंख्या भरगच्च होती. मात्र आता पाच सेंटरमध्ये एकही रुग्ण नाही. आले. यात विद्यापीठातील रमाई, छत्रपती, संत तुकाराम, देवगिरी गर्ल्स होस्टेल आणि पीईएस अभियांत्रिकी महाविद्यालयाचा समावेश आहे.

मेल्ट्रॉन अद्यापही फुल्लच काेराेना काळात मनपाने मेल्ट्रॉन हे सुसज्ज हाॅस्पिटल सुरू केले. पहिल्या आठवड्यापासून येथे रुग्णसंख्या वाढत गेली. येथे ऑक्सिजन आणि आयसीयूसह, रेमडेसिवर इंजेक्शनची सुविधा, सीटी स्कॅन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे येथे केवळ गंभीर रुग्णांना प्राधान्य देण्यात येत असते. येथील ३८० बेडपैकी ३५७ रुग्ण उपचार सुरू अाहेत.

विद्यापीठातील कोविड सेंटरमध्ये २१ रुग्ण रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने मनपाने तातडीने विद्यापीठातील रमाई, यशवंत आणि छत्रपती असे तीन होस्टेल ताब्यात घेत रुग्ण भरती केले होते. मात्र महिनाभरातच रुग्ण घटले. त्यामुळे तिन्ही कोविड सेंटरपैकी केवळ यशवंत हॉस्टेलमध्ये २१ रुग्ण भरती आहेत. उर्वरित दोन्ही सेंटर रिक्तच आहेत.

बातम्या आणखी आहेत...