आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ग्राउंड रिपोर्ट:ऑटो मॅन्युफॅक्चरिंग : महाराष्ट्रात सुमारे 50%, गुजरातमध्ये 90% प्लँट सुरू

औरंगाबाद/अहमदाबाद (महेश जोशी, मंदार दवे)10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • वाहन उद्योगात महाराष्ट्राची ३५ व गुजरातची १०% हिस्सेदारी
  • महाराष्ट्रात ३५% आणि गुजरातेत ३०% क्षमतेने होत आहे काम

टाळेबंदीत जवळपास दोन महिने ठप्प झालेली ऑटो उद्योगातील मॅन्युफॅक्चरिंग जूनच्या सुरुवातीपासून हळूहळू वेग पकडत आहे. देशाच्या एकूण वाहन उत्पादनात महाराष्ट्राची ३५% हिस्सेदारी आहे. पुणे, औरंगाबाद आणि नाशिकमध्ये अनेक मोठ्या ऑटो कंपन्या तसेच त्यांच्याशी संबंधित सहायक कंपन्यांचे प्लँट आहेत. यातून सुमारे ३५% क्षमतेने मॅन्युफॅक्चरिंग सुरू झाली आहे. पुण्याजवळील चाकणमध्ये जवळपास ६५० लहान-मोठ्या ऑटो कंपन्या आहेत. त्यातील निम्म्या म्हणजे ३०० मध्ये काम सुरू झाले आहे. महाराष्ट्रात वाहनाशी संबंधित १५ हजारांहून जास्त उद्योग आहेत. यामध्ये १० ते ११ लाख लोक काम करतात. मजुरांनी गावी स्थलांतर केल्यामुळे त्यांची टंचाई भासत आहे.

ऑटो उत्पादनात ८-१० टक्क्यांची हिस्सेदारी असणाऱ्या गुजरातमध्ये दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या ७५-१०० लहान मोठ्या कंपन्या आहेत. यापैकी ९० टक्के कंपन्यांमध्ये मॅन्युफॅक्चरिंग सुरू झाले आहे. आयशर मोटर्स, फोर्स मोटर्स, महिंद्रा आणि जॉन डिअरसारख्या कंपन्यांनी ७० टक्के क्षमतेसह उत्पादन सुरू केले आहे. मध्य प्रदेश इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पाेरेशनचे ईडी कुमार पुरुषोत्तम यांनी दिलेल्या माहितीनुसार, पिथमपूरमध्ये उत्पादन सुरू झाल्याने दैनिक वीज वापर फेब्रुवारीच्या तुलनेत ८३ टक्क्यांवर पोहोचला आहे.

गुजरात टू-व्हीलर डीलर असोसिएशनचे चेअरमन प्रणव शहा यांनी सांगितले की, कोरोना विषाणूमुळे लागलेल्या टाळेबंदीत लोकांकडे रोकड टंचाई आहे. लोक आर्थिक संकटाला तोंड देत आहेत. ते आपल्या गरजेनुसार वाहन खरेदी करू इच्छितात. मात्र, वाहन खरेदीचा निर्णय लांबणीवर टाकत आहेत. बँकांच्या कर्जवाटपाला वेग आला पाहिजे.

हळूहळू नव्या वाहनांच्या मागणीत तेजी येईल : तज्ज्ञ

ऑटो उद्योगातील जाणकारांनुसार, ऑटो कंपन्यांच्या डीलरशिपवर सर्व्हिससाठी येणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे. टाळेबंदीच्या नियमांत शिथिलता दिल्यासोबत लोक दैनंदिन जीवन सुरळीत करण्यावर भर देत आहेत. सध्या नव्या दुचाकी, चारचाकी वाहनांची मागणी कमी आहे. मात्र, बाजारात जसजशी स्थिती सामान्य होईल, तशी तेजी येईल.

ऑटोपूरक युनिटमध्ये ५०% कामगार परतले
राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातील भिवाडी, नीमराणासारख्या औद्याेगिक क्षेत्रांत लहान-मोठ्या ४०० पेक्षा जास्त ऑटोपूरक युनिट आहेत.हे मारुती, होंडासारख्या कंपन्यांसाठी रिंग्ज, इंजिन व्हॉल्व्ह आणि पिस्टनसारख्या ऑटो पार्ट््सची निर्मिती करतात. त्यांना ऑटो कंपन्यांकडून नव्या ऑर्डर मिळायला सुरुवात झाली आहे. मात्र, सध्या हे युनिट पूर्ण क्षमतेने उत्पादन करू शकत नव्हते.

भारत जगातील चौथा मोठा वाहन उद्योग
6.71% च्या दराने वाढत आहे देशातील वाहन विक्री
होंडा, मारुती, टाटा मोटर्सच्या प्लँटमध्ये सुरू झाले उत्पादन

होंडा कार्स इंडियाने टपकुडा आणि ग्रेटर नोएडा प्लँटमध्ये अंशत: उत्पादन सुरू केले आहे. कंपनीने ८ जूनपासून राजस्थानच्या टपुकडा संयंत्रात पॉवरट्रेनचे उत्पादन हळूहळू सुरू केले होते. यानंतर टपुकडासोबत यूपीच्या ग्रेटर नोएडा येथील प्लँटमध्येही १५ जूनपासून कारची निर्मिती सुरू केली आहे. कंपनीच्या मार्केटिंग आणि सेल्स विभागाकडून ही माहिती देण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...