आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'दिव्य मराठी' लक्षवेधी:पेट्रोलवर धावणाऱ्या जुन्या एक हजारावर ऑटोरिक्षा चालकांनी परस्पर बसवले गॅस किट

संतोष देशमुख । औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
आरटीओ, पोलिस डोळे असून अंधळ्याच्या भूमिकेत - Divya Marathi
आरटीओ, पोलिस डोळे असून अंधळ्याच्या भूमिकेत
  • अवैध प्रवासी वाहतुकही वाढली प्रवाशांचा जीव धोक्यात वाहतूक सेवेत व्यत्यय

शहरात पेट्रोलवर धावणाऱ्या एक हजाराहून अधिक ऑटोरिक्षा चालकांनी परस्पर एलपीजी गॅस किट बसवले आहेत. या पासून प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. दररोज वाहतुकीचा बोजवारा उडतोय. आरटीओ व पोलिस मात्र, डोळे असून अंधळ्याच्या भुमिका घेत आहेत. यामुळे गैरप्रकार व अवैध प्रवासी वाहतुकही वाढली आहे.

शहरात 35 हजारांवर ऑटोरीक्षा आहेत. प्रवासी संख्येत वाढ होत असल्याने दिवसेंदिवस ऑटोरिक्षांची संख्येतही वाढ होत चालली आहे. नवीन रिक्षा खरेदी करताना एलपीजी, पेट्रोल, सीएनजी, ई, या पैकी एक पर्याय निवडून त्यानुसार आरटीओची परवानगी घ्यावी लागते. पेट्रोल दरात प्रचंड वाढ झाली आहे. जून्या रिक्षांचे अव्हरेज कमी येते. पेट्रोल खर्चाच्या तुलनेत एलपीजी सिलेंडर बसवले तर परवडते. मात्र, जुन्या रिक्षांना गॅस किट बसवण्याची परवानगी आरटीओ देत नाहीत. त्यामुळे ऑटोरिक्षा चालक मालक परस्पर किट बसवून घेत आहेत. आजवर 1 हजारांहून अधिक रिक्षा चालकांनी गैरमार्गाने गॅस किट बसवून घेतले व प्रवासी वाहतुकही सुरु केली आहे. याची तपासणी होत नाही. परिणामी गैरमार्गाने गॅस किट बसवून घेण्याचा धंधा तेजीत सुरु आहे.

याकडे अक्षम्य दुर्लक्ष

ऑटोरीक्षा फिटनेस, विमा, परवाना, क्यू आर कोड न लावणे, गणवेश परिधान न करणे, अवैध प्रवासी वाहतूक, अवैध गॅस किट बसवणे, कुठेही रिक्षा थांबवणे, कर्कश हॉर्न, अश्लिल हावभाव करणे, आवाजात प्रवाशांना बोलणे, आदी परिवहन व वाहतुक नियम, कायद्याचे सर्रास उल्लंघन होत असून याकडे पोलिस व आरटीओ प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे.

गैरप्रकार व अवैध प्रवासी वाहतुक थांबवा

ऑटोरिक्षा चालक कृती महासंघाचे अध्यक्ष निसार अहेमद खान म्हणाले की, आरटीओ व पोलिस 100 ते 200 रुपयांची पावती देऊन थातूरमातूर कारवाई करतात. यामुळे शहर वातुकीचा प्रश्न सुटणार नाही. त्यामुळे विनापरवानगी एक हजारहून अधिक पेट्रोल रिक्षेला जे एलपीजी गॅस किट बसवले आहेत त्यांच्यावर नियमाप्रमाणे ठोस कारवाई करावी. अवैध प्रवासी वाहतूक व सर्व गैर प्रकार थांबवावे. याची आम्हीच मागणी करतोय. मात्र, पोलिस व आरटीओ प्रशासन दुर्लक्ष करत आहे. प्राधिकरण परिवहन समिती लक्ष देत नाही.

नियमांचे उल्लंघन

ऑटोरिक्षा चालक एक आणि तीन प्रवासी अशा प्रकारे परवानगी दिलेली आहे. मीटरचे दर 14 रूपये प्रति किमी प्रवासी भाडे निश्चित करण्यात आले आहेत. प्रत्यक्षात चालकाजवळ 2 आणि आतमध्ये प्रवासी सिटावर तीन ऐवजी चार ते पाच, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरून शहरातील मुख्य ते अंतर्गत मार्गावर दिवसरात्र ऑटोरिक्षा धावत आहेत. याकडे आरटीओ व पोलिस डोळेझाक करतात. त्यामुळे गैरप्रकार प्रचंड वाढ झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...