आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हेगारी वृत्त:नशेच्या गोळ्या विकणारा रिक्षाचालक अटकेत

औरंगाबाद12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

परराज्यातून येऊन शहरात रिक्षा चालवताना नशेच्या गोळ्यांची विक्री करणाऱ्या आराेपीला रविवारी सकाळी सिडको पोलिसांनी अटक केली. एका स्थानिक रेकॉर्डवरील गुन्हेगारासोबत तो जाधववाडी परिसरात गोळ्या विकताना पकडला गेला. शेख असिफ शेख जिलानी (३७, रा. रेंगटीपुरा) असे गुन्हेगाराचे नाव असून इब्राहिम शाह अकबर शाह (४३, रा. बापूनगर, मूळ सुरत, गुजरात) असे रिक्षाचालकाचे नाव आहे. दोघांना २३ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

सिडको ठाण्याचे निरीक्षक संभाजी पवार यांना एका खबऱ्याने जाधववाडीत दोन व्यक्ती नशेच्या गोळ्यांची विक्री करत असल्याची माहिती दिली. त्यांनी उपनिरीक्षक अशोक अवचार यांना कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार अवचार, कैलास अन्नलदास, अंमलदार सुभाष शेवाळे, प्रदीप दंडवते, किरण काळे, विशाल सोनवणे यांच्या मदतीने सापळा लावला. काही वेळात खबऱ्याने दिलेल्या वर्णनानुसार इब्राहीम व असिफ तेथे आल्याचे कळाले. दोघांना ताब्यात घेत औषध निरीक्षक अंजली मिटकर यांच्या मदतीने त्यांच्याकडे असलेल्या गोळ्यांची तपासणी केली. तेव्हा नायट्रोसनच्या ३९० गोळ्यांच्या आठ स्ट्रिप सापडल्या.

बातम्या आणखी आहेत...