आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबंगालच्या उपसागरातील वादळी प्रणालीमुळे राज्यात अवकाळी पावसाला पोषण वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे दोन दिवसांपासून राज्यात ठिकठिकाणी ढगाळ वातावरणासह हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. नांदेड व परभणी जिल्ह्यांत मंगळवारी पाऊस झाला. नांदेड शहरासह परिसरात दुपारी २ वाजेच्या सुमारास मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली. १५ ते २० मिनिटे झालेल्या पावसाने वाहनधारकांसह विक्रेते, नागरिकांची एकच तारांबळ उडाली.
दुसरीकडे, जळगाव जिल्ह्यातील भुसावळ, नशिराबाद, पारोळा भागातही पाऊस पडला. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात हलक्या पावसाची नोंद झाली. सोलापूर जिल्ह्यात रविवारी व सोमवारी सायंकाळी पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी बरसल्या होत्या. यामुळे द्राक्ष, डाळिंब बागायतदार शेतकरी धास्तावले आहेत.
पिकांना फटका
अवकाळी पावसाचा तूर, कपाशी, गहू, ज्वारी आदी पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. अवकाळीमुळे द्राक्ष मण्यांची गळ होते, तर आंबा पिकाचा मोहर गळून जातो. द्राक्ष घेणाऱ्यांची शेतकऱ्यांचीही संख्या चिंता वाढली आहे.
थंडीची तीव्रता कमी होणार
हवामान खात्यानुसार, मराठवाड्यात आकाश अंशत: ढगाळ राहून १४ डिसेंबरला तुरळक ठिकाणी तर १५ डिसेंबरला जालना जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता आहे. १९ डिसेंबरपर्यंत मात्र थंडीचे प्रमाण कमीच राहण्याचा अंदाज आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.