आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराझाडे लावण्याची मियावाकी पद्धत म्हणजे लहान खड्ड्यांमध्ये अनेक प्रकारचे वृक्ष दाटीने लावले जातात. जपानमधील वनस्पतिशास्त्रज्ञ अकिरा मियावाकी यांची ही मूळ संकल्पना आहे. झाडे लावण्याच्या या पद्धतीचा पर्यावरण संवर्धनासाठी कसा उपयोग होतो, याचे संशोधन शहरातील स्टेपिंग स्टोन हायस्कूलमध्ये सहावीच्या वर्गात शिकणारा अवनीश विजय जाधव करतो आहे. याबाबतचा प्रकल्प तो होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धेत सादर करणार आहे. या स्पर्धेतील तिसऱ्या टप्प्यासाठी त्याची निवड झाली आहे.
अवनीश वाळूज येथील टूल टेक टऊलिंगस, वन विभाग आणि खाम इको पार्क मियावाकी फॉरेस्टचा अभ्यास करत आहे. आतापर्यंत त्याने सहा हजार चौरस फुटांवरील ‘मियावाकी फॉरेस्ट’चा अभ्यास केला. या पद्धतीने वृक्ष दहापटीने वाढून दोन ते तीन वर्षांतच मोठे जंगल तयार होते. हे जंगल ३० पट घनदाट असते. सुमारे ३० पट कार्बन शोषून घेतला जात असल्याने हे जंगल पर्यावरणासाठी अत्यंत लाभदायक आहे, असे त्याने सांगितले.झाडे लावण्याच्या मियावाकी पद्धतीविषयी संशोधनासाठी अवनीश जाधव याला प्राचार्य डॉ. डिक्रुज, नितीन बाहेती, रश्मी बाहेती मार्गदर्शन करत आहेत.मियावाकी पद्धतीत केवळ स्थानिक प्रजातींचा वापर करून रोपट्यांची दाट लागवड केली जाते. रोपटी निवडतानाही दुर्मिळ प्रजातींना प्राधान्य देण्यात येते. मियावाकी जंगलात एक महिना ते १२ महिने वयाची रोपे लावण्यात येतात. यातून विविध प्रजातींच्या वृक्षांचे घनदाड जंगल तयार केले जाते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.