आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रीडा महोत्‍सव:अवतिंका, निखिल सर्वात वेगवान धावपटू;  साेलापूरच्या संताेषी, मुंबईच्या आर्यनला सुवर्ण

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • यजमान औरंगाबाद, जळगाव, अमरावती विद्यापीठाची आगेकूच

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे आयोजित राज्य आंतर विद्यापीठ स्पर्धेत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूर, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, पुणे विद्यापीठ व मुंबई विद्यापीठाच्या संघाने पदकाचे खाते उघडले. अॅथलेटिक्स स्पर्धेत १०० मीटर धावण्याच्या शर्यतीत शिवाजी विद्यापीठाचा निखिल पाटील (१०.६० सेकंद) व पुण्याची अवंतिका नराळे (१२.०० सेकंद) सर्वात वेगवान धावपटू ठरले. उंच उडी प्रकारात मुंबईच्या आर्यन पाटील आणि मुलींच्या थाळी फेक प्रकारात संतोषी देशमुखने उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. विद्यापीठाच्या मैदानावर सुरू असलेल्या स्पर्धेत मुलींच्या थाळी फेक प्रकारात सोलापूरच्या संतोषी देशमुखने पुण्याच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अमेरा शाहला मागे टाकत सोने जिंकले. संतोषीने ४३.०५ मीटर थाळी फेकली, तर अमेराने ४२.०२ मीटर थाळी फेकली. कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाच्या सिद्धी करांडेला (४०.२२ मीटर) कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. त्याचबरोबर, पुरुष गटातील उंच उडी प्रकारात मुंबई विद्यापीठाच्या आर्यन पाटीलने २.०३ मीटर उंच उडी घेत सुवर्ण जिंकले. त्याने यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या धैर्यशील गायकवाडला (१.९६ मी.) पराभूत केले. धैर्यशीलने रौप्यपदक आणि पुणे विद्यापीठाच्या ऋषिकेश ढोमसेने (१.८५ मी.) कांस्यपदक जिंकले.

अॅथलेटिक्स इतर निकाल : उंच उडी मुली - सावणी देसावळे, शिवाजी विद्यापीठ (१.६० मी.), दिव्या ठाकरे, संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती (१.४० मी.), रसिका माळी, बहिणाबाई चौधरी विद्यापीठ जळगाव (१.३५ मी.). थाळी फेक पुरुष - सतीश देशमुख, पुणे विद्यापीठ (४८.६९ मी.), प्रफुल१ल थोरात, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर (४०.३४ मी.), पृथ्वीराज गोडसे, सोलापूर विद्यापीठ (३८.१६ मी.). १०० मीटर धावणे - निखिल पाटील, शिवाजी विद्यापीठ (१०.६० सेकंद), प्रणव गौरव, पुणे विद्यापीठ (१०.८० सेकंद), प्रतिक पाटील, शिवाजी विद्यापीठ (१०.९० सेकंद). १०० मीटर महिला - अवंतिका नराळे, पुणे विद्यापीठ (१२.०० सेकंद), साक्षी जोहरे (१२.२० सेकंद)

कबड्डी : औरंगाबादची सोलापूरवर २४ गुणांनी मात स्पर्धेत पुरुष कबड्डी गटात यजमान डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या संघाने सोलापूर विद्यापीठावर २४ गुणांनी मात केली. कबड्डीचे इतर निकाल : अमरावती विद्यापीठ वि.वि. कृषी विद्यापीठ परभणी (४५ गुण), नागपूर विद्यापीठ वि.वि. कृषी विद्यापीठ राहुरी (४० गुण), एसएनडीटी विद्यापीठ वि.वि. आरोग्य विद्यापीठ नाशिक (४४ गुण), मुंबई विद्यापीठ वि.वि. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ (४० गुण), गोंडवाना विद्यापीठ वि.वि. लोणेर विद्यापीठ (२३ गुण), शिवाजी विद्यापीठ वि.वि. कालिदास संस्कृती विद्यापीठ (४३ गुण).

खो-खो : मुंबई, औरंगाबाद, पुणे संघ विजयी स्पर्धेत पुरुष खो-खो प्रकारात मुंबई विद्यापीठाने कृषी विद्यापीठ दापोली संघावर एक डाव व ८ गुणांनी मात केली. यजमान औरंगाबादच्या संघाने गोंडवाना विद्यापीठावर एक डाव ९ गुणांनी विजय मिळवला. यजमान संघाकडून ऋषिकेश मोतावडे (१.४० मिनिट संरक्षण), अवधूत (१.२० मिनिट संरक्षण), विजय शिंदे (२.२० मिनिट), राहुल मंडल, अविनाशने सुरेख खेळी केली.

बातम्या आणखी आहेत...