आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तापमान:सरासरी पारा 3 अंशांनी घसरला, थंडी वाढली

औरंगाबाद12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

यंदाच्या सत्रात शुक्रवारी प्रथमच शहराचे किमान तापमान ११.५ अंश नीचांकी पातळीवर आले होते. शनिवारी त्यात आणखी ०.४ अंशांनी घसरण होऊन ते ११.१ अंश सेल्सियसवर नोंदवले गेले. सरासरीच्या तुलनेत तीन अंशांनी रात्रीचे तापमान कमी झाले आहे. याचबरोबर दिवसाचे तापमानही एक अंशाने घटले आहे.

उत्तरेत बर्फवृष्टी होत आहे. तिकडील अतिशीत वारे आपल्याकडे दाखल होत आहे. परिणामी ११ नोव्हेंबरपासून थंडीचा कडाका हळूहळू वाढण्यास सुरुवात झाली. १७ ते १९ नोव्हेंबरदरम्यान सलग तीन दिवसांपासून रात्रीचे तापमान सरासरीच्या तुलनेत तीन अंशांनी कमी असल्याची नोंद चिकलठाणा वेधशाळेने घेतली आहे. थंडीचा कडाका वाढला आहे. परिणामी सायंकाळ ते सकाळी नऊ वाजेपर्यंत गरम कपड्याविना बाहेर पडणे आता कठीण झाले आहे. रात्री आठ वाजेनंतरच्या शहरातील वाहतूक व गर्दी कमी झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...