आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:आमिषाच्या माेहात फसवणूक हाेणे टाळा; मौलाना आझाद काॅलेजात सायबर गुन्ह्यांपासून वाचवण्याच्या टिप्स

औरंगाबाद2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगात विनामूल्य काहीच मिळत नाही, परंतु असे असतानाही आपण मोबाइलद्वारे एका सोप्या प्रश्नांच्या बदल्यात लाखो रुपयांचे बक्षीस जिंकण्याची इच्छा ठेवत सायबर गुन्ह्यांच्या सापळ्यात अडकतो. त्यामुळे अशा मोफत मिळणाऱ्या, सोप्या पद्धतीने मिळणाऱ्याच्या मागे जाऊन स्वत:ची फसवणूक करून घेऊ नये, असे आवाहन प्राचार्य मजहर फारुकी यांनी विद्यार्थ्यांना केले.

मौलाना आझाद महाविद्यालय आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे आयोजित सायबर गुन्ह्यांबद्दल मार्गदर्शनासाठी २४ नोव्हेंबर रोजी शिबिर झाले त्या वेळी ते बोलत होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एम. कोचे, विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव तसेच वरिष्ठ न्यायाधीश वैशाली फडणीस, सायबर क्राइम ब्रँचचे पोलिस उपनिरीक्षक राहुल चव्हाण यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाची सुरुवात प्रा. सय्यद तौफिक यांनी कुराण पठणाने केली. प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मझहर अहमद फारुखी यांनी केले. कोचे म्हणाले की, समाजमाध्यमांचा वापर करताना अतिशय संवेदनशील असणे आवश्यक आहे. सूत्रसंचालन प्रा. फेरोज पठाण यांनी, तर आभार वैशाली फडणीस यांनी मानले. या वेळी प्रा. अदिती भट्टाचार्य, प्रा. शेख अब्बास यांची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...