आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबाद:गर्दी टाळा, अन्यथा पुन्हा कडक लॉकडाऊन : पालकमंत्री सुभाष देसाई

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. नागरिकांकडून अद्यापही नियम पाळले जात नाहीत. किमान आता तरी मास्क लावा, सुरक्षित अंतर पाळा, गर्दी टाळा अन्यथा पुन्हा कडक लॉकडाऊन अटळ आहे, असा इशारा पालकमंत्री सुभाष देसाई यांनी शुक्रवारी दिला.

माध्यमांशी बाेलताना देसाईंनी सांगितले, ‘सध्याची स्थिती चिंताजनक आहे. नागरिकांना किमान आता तरी नियमांचे पालन करून लॉकडाऊन टाळला पाहिजे. शासनाला लॉकडाऊन लावून नागरिकांना त्रास देण्याची हौस नाही. कोरोना टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना मात्र लाेकांनी सक्तीने अंमलात आणायला हव्यात,’ असे ते म्हणाले. यावेळी आमदार अंबादास दानवे, पालिका प्रशासक आस्तिककुमार पांडेय, अतिरिक्त आयुक्‍त बी.बी. नेमाने, शहर अभियंता सखाराम पानझडे, उद्यान अधीक्षक विजय पाटील, पीएमसीचे पीयूष जैन, कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे आदी उपस्थित हाेते.

परिस्थिती पाहून निर्णय घ्या
कोरोनाची स्थिती लक्षात घेऊन निर्बंध अजून कडक करण्याबाबत तुमच्या पातळीवर निर्णय घ्या, अशा सूचना पालकमंत्री सुभाष देसाई यांनी जिल्हा प्रशासनाला आढावा बैठकीत केल्या. प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे म्हणाले, ‘कोरोनाचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. आम्ही रोज आढावा घेऊन अजून कोणत्या बाबींवर निर्बंध आणता येतील, याचा विचार करत आहाेत.’

बातम्या आणखी आहेत...