आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काम रखडले:शिवाजीनगर रेल्वे गेटच्या भुयारी मार्गासाठी सुधारित प्रस्ताव पाठवण्यास टाळाटाळ; दोन वेळेस पत्र देऊनही महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

औरंगाबाद15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवाजीनगर रेल्वे गेटच्या भुयारी मार्गासाठी विकास आराखड्यात नसलेल्या व अस्तित्वात असलेल्या २४ मीटर रस्त्यासह भूसंपादनाचा सुधारित प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना पाठवण्यास महापालिकेकडून टाळाटाळ केली जात आहे. भूसंपादन अधिकाऱ्यांनी दोन वेळा पत्र देऊनही मनपा प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे जमीन संपादनाची प्रक्रिया रखडली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. शिवाजीनगर भुयारी मार्गाच्या भूसंपादनासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने १ कोटी ८१ लाख रुपयांचा निधी महापालिकेकडे जमा केला.

महापालिकेने तो जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सुपूर्द केला. जिल्हाधिकारी कार्यालयाचे भूसंपादन अधिकारी व्ही. बी. दहे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता सुर्यवंशी, महापालिकेचे नगररचना विभागाचे संजय चामले यांनी जागेची पाहणी केली. त्या वेळी देवळाई चौक ते रेल्वेगेटदरम्यान दोन्ही बाजूंनी दीडशे फूट लांब आणि २४ मीटर रुंद याप्रमाणे भूसंपादन करण्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले होते.

पण विकास आराखड्यामध्ये २४ मीटर रस्त्याचा समावेश नसल्यामुळे सध्याच्या रस्त्यासाठी भूसंपादन करण्यासाठी प्रक्रिया राबवावी लागणार आहे. त्यामुळे महापालिकेकडून सुधारित प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठवणे गरजेचे आहे. मनपाच्या नगररचना विभागाने दोन ओळींचा संदर्भ देत प्रस्ताव सादर केला. पण या प्रस्तावात २४ मीटर रस्त्यासाठी भूसंपादनाचा उल्लेख नव्हता.

बातम्या आणखी आहेत...