आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महामारीत माणुसकी जपा, लस घ्या:जागरुक रहा विज्ञान नाट्यमहोत्सवात छोट्या मुलांचे समस्यांवर वैज्ञानिक दृष्टीकोनातुन भाष्य

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे मानवी जनजीवन अगदी विस्कळीत झाले. माणसातला माणूस देखील दुरावला. अनेकांनी आपल्या जवळची माणसही गमवली. पण या महामारीच्या संकटता तुम्हाला माणूसकीची साथ हवी ही शिकवणही मिळाली. असे असतांना वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगा आणि लस घ्या ,जागरुक रहा असा संदेश शालेय विद्यार्थ्यांनी नाटकाच्या माध्यमातून दिला.

नाट्यमहोत्सवात 20 संघाचा समावेश

दरम्यान, औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्हास्तरीय विज्ञान नाट्यमहोत्सवाचे आयोजन शहरातील शहानूर मियाँ दर्गा येथील जैन इंटनॅशन शाळेच्या सभागृहात करण्यात आले होते. या नाट्यमहोत्सवात तालुकास्तरावरुन एकूण 20 संघ सहभागी झाले होते. गेल्या दोन वर्षापासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ही महोत्सव स्पर्धा ऑनलाइन पद्ध्तीने होत होती. परंतु आता प्रादुर्भाव कमी झाल्याने प्रात्यक्षरित्या ही स्पर्धा घेण्यात आली. विद्यार्थ्यांना या स्पर्धेसाठी " मानव कल्याणासाठी विज्ञान व तंत्रज्ञान", "लसीकरणाची कथा, महामारी सामाजिक व वैज्ञानिक", "जीवन मानाचा दर्जा उंचावण्यासाठी तंत्रज्ञानाची नवकल्पना आणि संशोधन ", "मूलभूत विज्ञान व शाश्वत विकास आणि समस्या " आदी विषय देण्यात आले होते.

कोरोना महामारी अन् लसीकरणावर नाटीका सादर

यात बहुतांश संघांनी कोरोना महामारीतील परिस्थिती आणि लसीकरण जनजागृती विषयावरील नाटिका सादर केली. विषयांची मांडणी, वेशभूषाने सर्वांचे लक्ष वेधले होते.खामगाव येथील जि.प. शाळेने कोरोनामुळे आपल्या जवळील व्यक्ती गमावल्याने निर्माण झालेली परिस्थिती आणि ऑनलाइन शिक्षणातील गंमती-जमती नाटिकेतून सादर केल्या तर विज्ञानाची जादू या आंबेलोहळ जि.प.शाळेतील विद्यार्थ्यांनी विज्ञानाने दिलेली नवी दृष्टी हा विषय नाटिकेतून दाखवला. या संघातून एका संघ राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होणार आहे. या नाट्यमहोत्सवाचे उदघाटन माध्यमिक शिक्षणाधिकारी एम.के. देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विस्तार अधिकारी जे.व्ही चौरे, बाळासाहेब चोपडे यांची उपस्थिती होती. याबरोबरच विज्ञान मेळावाही यावेळी घेण्यात आला.

निवड झालेले संघांची राज्यासाठी निवड

नाट्यमहोत्सव व विज्ञान मेळाव्यासाठी प्रत्येक तालुक्यातून एक या प्रमाणे नऊ संघ आले होते. तर विज्ञान प्रदर्शनात एकूण 84 मॉडेल्स मांडण्यात आले होते. यातून राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी प्राथमिक- 3, माध्यमिक 3, नाट्यमहोत्सवातून दोन व विज्ञान मेळाव्यातून दोन आणि प्राथमिक व माध्यमिक विभागाच्या प्रत्येकी एका शिक्षकाची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेले संघ
नाट्यमहोत्सव
- अंग्रजी टिका: अलमीर सेकंडरी स्कूल,
- विज्ञानाची जादू : जि.प. प्र. शाळा अंबेलोहळ (ता.गंगापूर)

विज्ञान मेळावा:
- अनुष्का नाडे (जि.प. प्रशाला तुर्काबाद खराडी (ता.गंगापूर)
- साकेत विनोद सिनकर (सरस्वती भूवन प्रशाला)

बातम्या आणखी आहेत...