आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सन्मान:कर्तृत्ववान औरंगाबादकरांना ‘द अचीव्हर्स’ अवाॅर्ड प्रदान ; 94.3 माय एफएमतर्फे सिंगापूर येथे रंगला सोहळा

औरंगाबाद10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

माय एफएमतर्फे समाजातील विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान औरंगाबादकरांना सिंगापूर येथे “द अचीव्हर्स’ अवाॅर्डने सन्मानित करण्यात आले. मागच्या वर्षी दुबई तर यंदा सिंगापूर येथे हा सोहळा झाला. संध्याकाळी फाइव्ह स्टार हॉटेल ग्रँड कॅपथ्रोन वाॅटरफ्रंट येथे बॉलीवूड अभिनेत्री सई ताम्हणकरच्या हस्ते विजेत्यांना पुरस्कार देण्यात आला.

महाराष्ट्रातून ७० जणांना हा पुरस्कार दिला. ज्यात औरंगाबादमधील दिंडोरी चिट फंडच्या सुमित्रा गावंडे, ममताज कलेक्शनच्या ममता जैन, प्रवीणस् हेरिटेज स्पा व सलूनचे प्रवीण ठाकूर, कविता ठाकूर, डी.एस कन्स्ट्रक्शनचे गणेश काटे, हमसफर ट्रॅव्हल्सचे रियाज कादर मोहंमद, डॉ. ए.ए. कादरी मेंटल हेल्थ केअरचे डॉ. मेराज कादरी, आशिष मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉ. आशिष झिंजुर्डे पाटील, यशस्विनी महिला पतसंस्थेचे पवन अधाने, सविता अधाने, हृदयम हार्ट केअर सेंटरच्या श्रद्धा रुणवाल-गादिया, एक्स्लेंट इन्व्हायरो ग्रुपचे सुभाष भानुदास मुदगडकर, पद्मजा जेम्स व रुद्राक्ष भाग्यविजयचे डॉ.विजय चाटोरीकर यांचा समावेश होता. स्टेशन हेड नितीन लोखंडे यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले. १५ व १६ नोव्हेंबरला सिंगापूरमधील विविध प्रेक्षणीय स्थळांना भेट देण्याची संधी विजेत्यांना त्यांच्या परिवारासोबत मिळाली.

बातम्या आणखी आहेत...