आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जागतिक शिक्षक दिन विशेष!:औरंगाबाद जिल्ह्यातील 17 शिक्षकांना पुरस्कार; तर 5 विशेष शिक्षकांचा गौरव

औरंगाबाद24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जागतिक शिक्षक दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषदेच्या वतीने दरवर्षी देण्यात येणारे जिल्हा शिक्षक पुरस्कार आज सोमवारी (05 सप्टेंबर) तापडीया नाट्यमंदिरात जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे यांच्या हस्ते वितरण करण्यात आले.

शिक्षकांचा गौरव

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनानिमित्त 5 सप्टेंबर हा दिवस ‘शिक्षकदिन' म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्त शिक्षण क्षेत्रात उत्तम काम करणाऱ्या शिक्षकांना पुरस्काराने गौरविण्यात येते. यावर्षी जिल्ह्यातील एकूण 17 शिक्षकांना पुरस्कार देण्यात आला. यात प्राथमिक विभागाच्या 9, माध्यमिक विभागाच्या 7 यात एका विशेष शिक्षकाचा समावेश करण्यात आला. तर 5 शिक्षकांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

यांना मिळाले पुरस्कार

यामध्ये प्राथमिक शिक्षक वर्षा बाबुराव देशमुख (वेंâद्रीय प्राथमिक शाळा, सातारा), शिवाजी लक्ष्मण डुकरे (प्राथमिक शाळा, भायगाव, वैजापूर), मनोजकुमार सुखदेव सरग (प्राथमिक शाळा, शेवता, पैठण), भगवान गुलाबराव जगताप (प्राथमिक शाळा, देवळाणा, कन्नड), सनी सुभाष गायकवाड (प्राथमिक शाळा, गाजरमळा, गंगापूर), दादाराव नरसिंग सोनवणे (वेंâद्रीय प्राथमिक शाळा, निल्लोड, सिल्लोड), सदाशिव अर्जुनराव बडक (प्राथमिक शाळा, वाकोद, पुâलंब्री), दत्तात्रय दिनकर मरळ (प्राथमिक शाळा, धामणगाव, रत्नपूर), दीपक सुभाष महालपुरे (प्राथमिक शाळा, पळाशी, सोयगाव). माध्यमिक शिक्षक पुढीलप्रमाणे - विद्या रामभाऊ सोनगिरे (प्रशाला सातारा), गणेश लक्ष्मणराव सुरवाडकर (प्रशाला शिवराई, वैजापूर), ताराचंद उत्तमराव हिवराळे (प्रशाला (मुलांची) पैठण), ब्रह्मदेव मारुतीराव मुरकुटे (प्रशाला अंबेलोहळ, गंगापूर), देविदास पितांबर बाविस्कर (प्रशाला शिवना, सिल्लोड), धनराज वसंत चव्हाण (प्रशाला जातेगाव, पुâलंब्री), प्रदीप धनराव सोनार (प्रशाला राजेराय टाकळी, रत्नपूर), पैठण येथील कन्या प्रशालेतील जगन भागाजी खंडागळे यांना विशेष शिक्षक म्हणून गौरविण्यात आले.

जिल्हाधिकारी सुनील चव्हाणांचे आवाहन

आमदार प्रशांत बंब यांनी शिक्षक मुख्यालयी रहात नाही. म्हणून आधीच त्यांच्या विषयी छोडलेल्या विरोधी मोहिमे नंतर आता सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांनी देखील शिक्षकांच्या सत्कार समारंभात कानपिचक्या घेत कानमंत्र दिला. शाळेत वेळेत हजर राहून शाळा वेळेत सुरू करा. आपण विद्यार्थी घडवण्यासह समाज घडवण्यासाठी पगार घेतो. तेंव्हा शैक्षणिक वातावरण चांगले ठेवण्याबरोबरच त्याची गुणवत्ता राखण्याची जबाबदारी शिक्षकांची आहे असे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले.

कार्यक्रमात केले वक्तव्य

औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या वतीने सोमवारी शिक्षक दिनानिमित्त आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. त्यांच्या हस्ते एकूण 21 शिक्षकांना सन्मानित करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. प्रसंगी जि.प.चे मुख्यकार्यकारी अधिकारी नीलेश गटणे, माध्यमिक शिक्षणाधिकारी एम.के.देशमुख,प्रादेशिक विद्या प्राधिकरणचे संचालक डॉ. कलिमोद्दीन शेख ,विस्तार अधिकार आर.व्ही.ठाकुर,एल.ए.सोफी,संगीता सावळे,संदीप पवार यांची उपस्थिती होती.चव्हाण म्हणाले, आमच्यावेळी मुख्याध्यापक वर्गावर येणार किंवा शाळेत शिक्षणाधिकारी,विस्तार अधिकारी येणार म्हटल की भिती असायची.पण आता तर शाळांमध्ये अधिकारी येणार म्हटलं की प्रसन्न वातावरण अन् खान-पानाची चहल असते. असे म्हणत शाळा भेटीत होत असलेल्या प्रकारावरही टोलेबाजी करत शिक्षक पुरस्कारही कसे दिले जातात यावरही मार्मीक शब्दात प्रहार केला.

विद्यार्थी घडवण्यात शिक्षकांचे योगदान

केंद्रसरकार आणि राज्यसरकार मोठया प्रमाणात शिक्षणावर खर्च करत असते.तर ग्रामस्थांची एवढीच शिक्षकांकडून अपेक्षा आहे की, तुम्ही मुलांची गुणवत्ता वाढवा शाळा वेळेत सुरू करा. प्रादेशिक विद्याप्राधिकरणचे संचालक डॉ.शेख म्हणाले की, विद्यार्थी घडवण्यात शिक्षकांचे योगदान मोलाचे आहे.तर विद्यार्थी हाच शिक्षकासाठी दैवत आहे. मुख्यकार्यकारी अधिकारी गटणे म्हणाले,शिक्षकांना आनंद वाटेल असे शिकवले पाहिजे.अशी आहेत सन्मानित करण्यात आलेल्या शिक्षकांची नावे -प्राथमिक विभाग - वर्षा देशमुख, शिवाजी डुकरे, मनोजकुमार सरग, भगवान जगताप, सनी गायकवाड, दादाराव सोनवणे, सदाशिव बडक, दत्तात्रय मरळ, दीपक महालपुरे आदी.माध्यमिक विभाग - विद्या सोनगिरे,गणेश सुरवाडकर, ताराचंद हिवराळे, ब्रम्हदेव मुरकुटे, देविदास बावीस्कर, धनराज चव्हाण, प्रदीप सोनार, जगन खंडागळे आदी. विशेष पुरस्कार - बापू बावीस्कर, शैलेश जावळे, नितीन गबाले, मनोहर लबडे, मुरलीधर लगड

यांची होती उपस्थिती

तर बापू सुकदेव बावीस्कर (प्राथमिक शाळा, दत्तवाडी, वेंâद्र सोयगाव), शैलेष प्रभाकर जावळे (प्राथमिक शाळा, बोरगाव, वेंâद्र अंबेलोहळ), नितीन दत्ताप्पा गबाले (वेंâद्रीय प्राथमिक शाळा, गारखेडा नं. 1, ता. संभाजीनगर), मनोहर भास्कर लबडे (प्राथमिक शाळा, निमगाव, ता. वैजापूर) व मुरलीधर पोपट लगड (प्राथमिक शाळा, आमसरी, ता. सिल्लोड) यांचा देखील सन्मान करण्यात आला. यावेळी जि प मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटणे, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी मधुकर देशमुख,प्रादेशिक विद्या प्राधिकरण चे संचालक डॉ.कलीमुद्दीन शेख, शिक्षक, पालक, ग्रामस्थ, शिक्षणप्रेमींनी नागरिकांची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...