आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आझाद चषक टी- 20 स्पर्धा:एनके संघाने गुल्लूला हरवले, सामनावीर मो. इम्रानची अष्टपैलू खेळी

छत्रपती संभाजीनगर25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

लकी क्रिकेट अकादमीतर्फे आयोजित आझाद चषक टी-२० क्रिकेट स्पर्धेत एनके संघाने विजय मिळवला. नवल टाटा स्टेडियमवर झालेल्या लढतीत एनकेने गुल्लू रेंजर्स संघावर ५२ धावांनी मात केली. यात अष्टपैलू मो. इम्रान सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.

नाणेफेक जिंकून गुल्लू रेंजर्सने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. मात्र त्यांच्या निर्णय गोलंदाजांनी अपेक्षीत कामगिरी न करता चुकीचा ठरवला. संघ पराभूत झाला. प्रथम फलंदाजी करताना एनके संघाने २० षटकांत ५ बाद १८९ धावा उभारल्या. यात संघाची सुरूवात खराब झाली. गत लढतीतील सामनावीर ठरलेला सलामीवीर शुभम हरकळ अवघ्या ७ धावा करुन परतला. दुसरा सलामीवीर धीरज थोराही ७ धावांवर बाद झाला.

यष्टिरक्षक फलंदाज अविनाश मुकेने ३९ चेंडूंत ४ चौकार व १ षटकार खेचत ४५ धावा काढल्या. आर्यन शेजुळने फटकेबाजी करत १७ चेंडूंत ३ चौकार व २ षटकार खेचत ३० धावा जोडल्या. आर्यन व अविनाश जोडीने तिसऱ्या गड्यासाठी ६६ धावांची भागीदारी केली. त्यानंतर आलेल्या कर्णधार प्रदीप जगदाळेने ३७ चेंडूंचा सामना करताना ३ चौकार व २ उत्तुंग षटकार खेचत सर्वाधिक ४८ धावांची खेळी केली. त्याचे अर्धशतक अवघ्या २ धावांनी हुकले. गुल्लूने माजेद खानच्या हाती त्याला झेल बाद केले.

मो. इम्रानने १२ चेंडूंत ४ चौकार व १ षटकार मारत नाबाद २८ धावांचे योगदान दिले. इम्रान अली खान १२ धावांवर नाबाद राहिला. गुल्लूकडून फिरदीने २ आणि गुल्लू, माजेद खान, सचिन शेंडगे यांनी प्रत्येकी एक एक गडी बाद केला.

जुनैद पटेलची एकाकी झूंज

प्रत्युत्तरात गुल्लू रेंजर्स संघ निर्धारित षटकांत ६ बाद १३७ धावा करू शकला. यात शोएब अहमद सिद्दीकीने ११ व सय्यद जलीसने ११ धावा केल्या. जुनैद पटेलने ३५ चेंडूंत ३ चौकार व ४ षटकार खेचत एकाकी झूंज देत सर्वाधिक ४७ धावांची खेळी केली. त्याला इतर फलंदाजांनी साथ लाभली नाही. कर्णधार गुल्लूने २६ चेंडूंत ३ चौकार व २ षटकारासह ३५ धावा जोडल्या. एनकेकडून इम्रान अली खानने २ आणि सलीम पाठण, व्यंकटेश सोनवलकर, मो. इम्रानने प्रत्येकी एक-एक गडी टिपला.

बातम्या आणखी आहेत...