आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनोखे आंदोलन:आजाद समाज पार्टीचा कार्यकर्ता कुंभकर्णाच्या वेशात, मनपा प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी

औरंगाबाद23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरवासीयांना भीषण पाणी टंचाईला सोमोरे जावे लागत आहे. तसेच रमाई घरकूल योजनेच्या निधीत वाढ करण्यात यावी, आदी मागण्यासाठी निवेदन आंदोलने करूनही प्रशासन दखल घेत नसल्याने आझाद समाज पार्टीच्यावतीने मनपा समोर अनोखे आंदोलन करण्यात आले.

चक्क कार्यकर्त्याला कुंभकर्णाच्या वेशात आणत मनपा प्रशासनाच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. तसेच मनपा प्रशासनाने कुंभकर्ण झोपेतून जागे व्हावे म्हणून कुंभकर्णच्या वेशात आलेल्या कार्यकर्त्याला निवेदन देत मनपा प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला.

महानगरपालिका प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराविरोधात आजाद समाज पक्षाच्या वतीने 9 जून रोजी मनपा प्रशासकीय इमारती समोर जोरदार निदर्शने करण्यात आले. शहरात नागरिकांना आठ ते दहा दिवस आड पाणी मिळत आहे. त्यात ही मुबलक पाणी मिळत नाही. तसेच शहरातील भावसिंगपुरा भागातील गट क्रमांंक 32 मधल्या अनाधिकृत बांधकाम करणाऱ्या भूमाफियांवर कावाई केली जात नाही. गरिब व गरजूंसाठी शासनाने रमाई घरकूल योजना जाहीर केली आहे.

मनपा प्रशासन कुंभकर्ण झोपेत

त्यासाठी मिळनारा निधी अत्यल्प आहे. तो वाढवून शहरी भागासाठी पाच लाख व ग्रमीण भागासाठी तीन लाख करण्यात यावे, आदी मागण्यासाठी वारंवार निवेदने देण्यात आली. तरी मनपा प्रशासन कुंभकर्ण झोपेत आहे. प्रशासन जागे होत नाही. त्यामुळे प्रशासनाला जागे करण्यासाठी आजाद समाज पक्षाच्यावतीने आंदोलन केले. प्रशासनाचा निषेध करणारे फलक हातात घेवून घोषणाबाजी केली. यानंतर पदाधिकाऱ्यांनी कुंभकर्ण वेशात आलेल्या कार्यकर्त्याला निवेदन दिले. यावेळी शहराध्यक्ष राहूल मकासरे, सिद्धार्थ भिंगारे, विकास घोडके, कपील मोरे, धम्मपाल मिसाळ आदींची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...