आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद शहर फार्मा क्षेत्रासाठी हब मानले जाते त्यामुळे येथे फार्मसीला प्रवेश घेण्यासाठी चढाओढ होताना दिसते. यंदा फार्मा हबमध्ये बी.फार्मसीच्या ३६.४८ टक्के तर डी.फार्मसीच्या ३३.८४ टक्के जागा तीन फेऱ्या होऊनही रिक्त राहिल्या आहेत. फार्मसी काैन्सिल ऑफ इंडियाने नवीन आणि जुन्या महाविद्यालयांना क्षमता ठरवून देण्यास विलंब केला. साडेचार महिने गोंधळ चालल्याने अखेर या जागा रिक्त राहिल्याचे चित्र आहे. मॅनेजमंेट कोट्यात या जागा भरल्या जातील, असा दावा तंत्रशिक्षण विभागाने केला आहे.
२०२२-२०२३ या शैक्षणिक वर्षाच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया ऑगस्टमध्येच पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाने मान्यतेपूर्वी सर्व सुविधा, क्षमतेच्या अटींची फेरपडताळणी करण्यासाठी सांगितले होते. जिथे प्रवेश क्षमता शंभर आहे. ती घटवून ५० केली होती. मात्र प्रवेशासाठी होणारा विलंब पाहता पुन्हा जैसे थे क्षमता केल्याने जुलैमध्ये सुरू होणारी प्रवेश प्रक्रिया नोव्हेंबरअखेरीस सुरू झाली. डिसेंबरअखेरीस तीन प्रवेश फेऱ्या पूर्ण झाल्या. आता मॅनेजमेंट कोट्यातील प्रवेश पूर्ण करण्यासाठी १० जानेवारीपर्यंत मुदत दिली आहे. या प्रक्रियेचा परिणाम म्हणजे नवे शैक्षणिक सत्र सुरू होण्यास तब्बल साडेचार महिने उशीर झाल्याने जागा रिक्त राहिल्या आहेत. कॉलेजसमोर वेळेत अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे आव्हान आहे.
पाच ते सात टक्के जागा रिक्त फार्मसीला प्रवेश चांगले झाले आहेत. ज्या अडीच हजार जागा रिक्त दिसतायत, त्या मॅनेजमेंट कोटा प्रवेशासाठी दिलेल्या मुदतीमध्ये पूर्ण भरल्या जातील. पदवीसाठी सीईटीची अट असल्याने ५ ते ७ टक्के जागा रिक्त राहू शकतात. यंदा प्रवेश उशिरा झाल्याने तासिका पूर्ण करण्यासाठी सुट्यांचे नियोजन करावे लागणार आहे. डॉ.उमेश नागदेवे, तंत्रशिक्षण सहसंचालक
नोकरी मिळण्यासाठी वेळ यंदा प्रवेश प्रक्रिया साडेचार महिने उशिरापर्यंत झाल्याने त्याचा परिणाम शैक्षणिक सत्रावर होईल. पुढील सत्र वेळेत सुरू होण्यासाठी तासिका पूर्ण कराव्या लागतील. तसेच सत्र लांबल्यामुळे ज्या वेळेत विद्यार्थ्यांना जॉब घ्यायचा आहे, तो लांबण्याची शक्यता आहे. व्ही.के. मौर्य, प्राचार्य शासकीय औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.